जळगाव – (प्रतिनिधी) – 27 रोजी नुकताच काल 26 जून रोजी शिक्षक आमदार निवडणूक संपन्न झाली यामध्ये भाजपाचे प्रदेश सचिव संदीप घुगे यांची जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांच्या 95 टक्के मतदानासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका यादरम्यान दिसून आली.
संदीप घुगे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या अभ्यासू टीम मधले एक मानले जातात त्यांनी 25 वर्षापासून भाजपा मध्ये तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे. संदीप घुगे हे माध्यमिक शिक्षक पतपेढी संचालक पदी उत्कृष्ट कामगिरी पाहत आहे त्याच माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील अनेक शिक्षकांशी यांची चांगली मैत्रीपूर्व नात आहे. पदवीधर आमदार निवडणूक असो व शिक्षक आमदार निवडणूक असो यामध्ये संदीप घुगे सर यांचा नेहमी पुढाकार असतो विशेष म्हणजे या क्षेत्रातील सर्व लोक यांना जवळ ठेवून आपल्या निवडणुकीसाठी उत्तम नियोजनासाठी त्यांचा वापर करतात
संदीप घुगे मूडचे चिंचोली येथील रहिवासी आहेत ते शिक्षक म्हणून धरणगाव येथे गेल्या अनेक वर्षापासून जबाबदारी पार पाडत आहे तसेच संदीप घुगे यांनी भाजपा मध्ये अनेक वर्षांपासून उत्कृष्ट कार्य केले आहे.
नुकतीच त्यांची भाजपाच्या प्रदेश सचिव भटक्या विमुक्त आघाडी वर मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी शिफारस देऊन नियुक्ती केली आहे त्याचबरोबर आमदार राजूभाऊ भोळे यांचाही नियोजनामध्ये संदीप घुगे सर यांचा नेहमी कामकाजासाठी पुढाकार असतो बूथ सक्षमीकरण असेल याद्यांचे नियोजन असेल मतदान नोंदणी असेल त्याच प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या ज्या ज्या वेळेस महत्त्वाच्या बाबी येतात त्यावेळेस संदीप घुगे सर आवर्जून अभ्यास व्यक्ती म्हणून या कामांची जबाबदारी अतिशय आनंदाने पार पाडतात.
नुकत्याच झालेल्या शिक्षक आमदार या निवडणुकीमध्ये जळगाव जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण मतदान केंद्र असेल शिक्षक मतदार यादी असेल या सर्वांचा काटेकोरपणे अभ्यास करून जास्त जास्त मतदान आमदार दराडे यांना कसे मिळेल यासाठी त्यांनी यावेळेसही पुन्हा प्रयत्न केलेला आहे.
गेल्या वेळेस आमदार किशोर दराडे यांच्या मायक्रो प्लॅनिंग मध्ये सुद्धा संदीप घुगे यांचा महत्त्वाचा वाटा होता
या वेळी आमदार किशोर दराडे व संदिप घुगे यांचे आमदार राजू मामा भोळे जिल्हाध्यक्ष उज्वला ताई जलकेर महाराज, भूषण लाडवंजारी या अभिनंद्दन केले.