Sunday, July 13, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/07/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
पं. स्व. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त “विरासत” मैफिलीत रसिक चिंब

जळगाव-( प्रतिनिधी) – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पं. वसंतराव चांदोरकरांच्या २३ व्या स्मृती दिनाच्या पूर्व संध्येस म्हणजे *रविवार दि. ७ जुलै २०२४* “विरासत” मैफिलीचे आयोजन केले होते. या मैफिलीस भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशनचे सहकार्य लाभले होते. कांताई सभागृहात रंगलेल्या मैफिलीची सुरवात प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार दीपक चांदोरकर यांच्या गुरुवंनदनेने झाली. दीपप्रज्वलन बहिणाबाई चौधरी उमवी चे कॉमर्स अँड मॅनेजमेंट विभागाचे डिन डॉ. अनिल डोंगरे व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते झाले. कलावंतांचा सत्कार उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, डॉ. अनिल डोंगरे व सचिव अरविंद देशपांडे यांनी केला.

अभिजात संगितात बखले घराण्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या स्व. पं. वसंतराव चांदोरकर यांच्या स्मृतींची आठवण केली गेली.या परंपरेतील कलाकारांना आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम म्हणजेच *विरासत* देवगंधर्व भास्करबुवा बखले हे सौ. शिल्पा पुणतांबेकर व सौ. सावनी दातार कुळकर्णी यांचे पणजोबा. त्यांनी गायलेले राग, संगीतबद्ध केलेली नाट्यपदे, अभंग, भक्तिगीते, भावगीते, गवळणी पासून ते लावणीपर्यंतचा वारसा, किंवा विरासत चा कॅनव्हॉस उलगडून दाखविला.
कार्यक्रमाची सुरुवात भूप रागातील ‘फुलवन सेज सवारू’ या बंदीशीने झाली व त्यालाच जोडून तरणा सादर केला गेला. त्यानंतर सं. स्वयंवर नाटकातील ‘ सृजन कसा मन चोरी’ हे नाट्यपद सादर केले याचे संगीत देवगंधर्व भास्करबुवा बखले यांचे आहे. त्यानंतर छोटा गंधर्व यांनी संगीतबद्ध केलेला ‘बोलू ऎसे बोले’ हा अभंग सादर झाला. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांनी संगीतबद्ध केलेले व माणिक वर्मा यांनी गाऊन अजरामर केलेले भावगीत ‘हसले मनी चांदणे’ हे सादर झाले. पं. भास्करबुवांचे पट्टशिष्य संगीतकलनिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीतबद्ध केलेले व जेष्ठ गायिका कै. जोत्सना भोळे यांनी गायलेले कुलवधू नाटकातील ‘ क्षण आला भाग्याचा’हे नाट्यपद सादर झाले. त्यानंतर मानापमान नाटकातील ‘ शुरा मी वंदिले’ हे पद सादर झाले. आग्रा घराण्याची सुप्रसिद्ध सोहनी रागातील बंदिश सादर झाली. बाळासाहेब माटे यांनी संगीत देऊन जोत्सना बाईनी गायलेली ‘ कुणीतरी सांगा जे’ ही गवळण सादर झाली. चित्रपट संगीतात मास्टर कृष्णा यांनी संगीत दिलेले ‘आता कशाला उद्याची बात’ हे गीत सादर झाले. यानंतर श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेला रामदास स्वामींचा ‘ताने स्वररंग व्हावा’ हा अभंग सादर झाला. विरासत कार्यक्रमाची सांगता सं. कान्होपात्रा नाटकातील ‘अगा वैकुंठीचे राया’ या अभंगाने झाली.

शिल्पा व सावनी यांना तितकीच दमदार साथसंगत केली ती समीर पुणतांबेकर (तबला) अमेय बिच्चू (संवादिनी) डॉ. राजेंद्र दूरकर (पखावज) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन यांच्या सहकार्याने सादर झालेली ही मैफल तमाम जळगावकर रसिकांना सुखावून गेली.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

Next Post

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Next Post
तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

तुमचा वकील म्हणून तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

गुरु पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रमातून डॉ केतकी ताई पाटील यांनी केली गुरूवंदना

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

प.वि.पाटील व ए.टी. झांबरे विद्यालयाची परिवहन समिती सभा संपन्न

Private:

जामनेर वनक्षेत्रपालांकडून माहिती “निरंक” चा सुर…. नंतर अपूर्ण माहिती देवून सारवासारव करण्याचा प्रयत्न…

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d