<
लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (ईश्वर खरे)
लोहारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे लोहारा श्री सदस्यांच्या हस्ते ६० वृक्षांची लागवड करण्यात आली. वृक्ष लागवड करून संवर्धनाची जबाबदारी प्रतिष्ठानच्या लोहारा बैठकीतील श्री सदस्यांनी घेतली. याआधी प्रतिष्ठाना तर्फे लोहारा (पोलीस दूरक्षेत्र)आऊट पोस्ट या ठिकाणी तसेच स्मशानभूमी येथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यांच्या ही देखभालीची जबाबदारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी घेतली होती. लावलेल्या रोपांचे रूपांतर आज रोजी डेरेदार वृक्षांमध्ये झालेले आहे.
या सोबतच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मुक्काम पोस्ट रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड मार्फत समाजसेवेचे कार्य परिसरात सुरू आहे. स्वच्छता अभियान, ओसाड विहिरीतील गाळ काढणे, समाज प्रबोधन, साक्षरता अभियान, बाल संस्कार केंद्र. अंधश्रद्धा निर्मूलन श्री बैठकीत मार्फत लोहारा येथे सुरू आहे. स्वयंस्पृतिने सर्व श्री सदस्य या कार्याला हातभार लावत आहे. प्रतिष्ठानच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या वेळी लोहारा शहर पत्रकार व
लोहारा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे लोहारा बैठकीतील श्री सदस्य, उपस्थित होते.