<
मानव संसाधन विकास मंत्रालय ,भारत सरकार च्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषद हैद्राबाद ने दिलेल्या निर्देशानुसार केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील प्राथमिक विद्यालयात दि.26 सप्टेंबर ते दि.2 ऑक्टोबर 2019 या कालावधीत नई तालीम कार्यशिक्षण सप्ताह राबवण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने सर्वप्रथम सर्व शिक्षकांची तालीम व मूलशिक्षणाबाबत सर्वप्रथम सभा घेण्यात आली.त्यांनतर स्थानिक कारागीर , दुकानदार ,शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विविध कामांचा आढावा घेण्यात आला.स्वच्छ परिसर उपक्रमाचे आयोजन करून स्वच्छता गृह सफाई व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.शालेय परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसेच विविध बियांच्या संकलनासाठी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.सायकल ,इस्त्री , दूरदर्शन इत्यादी साहित्य वापरा बाबत दिग्दर्शन करण्यात आले.स्क्रू ड्रॅइव्हर, कुलूप ,किल्ली ,पान्हे ,कात्री ,इत्यादी साहित्य वापरान्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.स्वयंपाक घरातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला त्याचप्रमाणे हे करत असताना प्रथमोपचार कसा करावा या विषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मुख्या.रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर यशस्वीतेसाठी उपशिक्षिका धनश्री फालक ,इंदू चौधरी ,वायकोळे मॅडम ,सूर्यकांत पाटील ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.