लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे) पहूर – येथून एकुलतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे .सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे .
पहूर -लोहारा मार्गावरील वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे . पहूर – एकूलती दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत . सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे .
साईड पट्ट्या खचल्या !
पहूर – एकूलती मार्गावर साईड पट्ट्या खचल्या आहेत तसेच गवताने आच्छादून गेल्या आहेत . यामुळे जेव्हा दोन वाहने समोरासमोर येतात तेव्हा वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही .सदर रस्त्यावरील खड्डे बुजवून साईड पट्ट्या दुरुस्त कराव्यात , अशी मागणी शेत शिवारात कडे जाणारे शेतकरी , प्रवासी वाहनचालकांसह नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.