<
महाविद्यालयीन प्राचार्य सह विद्यार्थी,पालक यांनी घ्यावा सहभाग – उच्च शिक्षण सह संचालक डॉ संजय ठाकरे
जळगाव – (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व कोणताही विद्यार्थी शिक्षणाला मुकणार नाही या विचाराने उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्री चंद्रकांत पाटील विविध शिष्यवृत्ती योजनां बाबतची माहिती देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी पालक व प्रतिनिधीशी वेबिनार द्वारे साधणार संवाद.
सविस्तर वृत्त असे की,शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये,अंशतःअनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्य्यालये/ तंत्रनिकेतने/ सार्वजनिक विद्यापीठे,शासकीय अभिमत विद्यापीठे (खाजगी अभिमत विद्यापीठ /स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत
येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक/पारंपारिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकार्यामार्फत राबविण्पात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे (Centralized Admission Process-CAP)(व्यवस्थापन कोट्यातील/संस्था स्तरावरील प्रवेश वगळून)प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी,ज्या मुलींच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पत्न रु.8.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,अशा व्यावसायिक अभ्यासक्रमां साठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकटृष्ट्या दूर्बल घटकांतील,इतर मागास प्रवर्गातील,सामायिक व शैक्षणिकदुष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या)मुलींना, उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास बहुंजन ऐवजी 100 टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच वरील प्रमाणे शैक्षणिक शुल्क व परिक्षा शुल्क यामध्ये 100 टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे,अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या (अर्जाचे नुतनीकरण केलेल्या),महिला व बालविकास विभाग,शासन निर्णय दि.06.04.2023 मध्ये नमुद केलेला”संस्थात्मक” व “संस्थाबाह्य या वर्गवारीमध्धे समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुले व मुली यांनासुध्दा अनुनेय करण्यात येत आहे. घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी हिताच्या राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांबाबतची माहिती देण्याकरीता राज्यातील सर्व विद्यार्थी,पालक व प्रतिनिधी यांचे सोबत श्री.चंद्रकांतदादा पाटील,मंत्री उच्च व तंत्र शिक्षण विभाग,दि. 25.जुलै 2024 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 दरम्यान webinar लिंकhttp://www.parthlive.com च्या माध्यमातून संवाद साधणार आहत.
या कार्यक्रमाचे LVE प्रक्षेपण आपापल्या संस्थामध्ये मोठ्या पडद्यावर (Sreen वर) सर्व विद्यार्थी व पालक यानां दिसेल व ऐकू येईल अशा पध्दतीची व्यवस्था करण्यात यावी व याकरीता आपापल्या संस्थेतील/ विद्यापीठ/महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व पालक यांना सदर कार्यक्रमास संस्थेत उपस्थित राहणे बाबत सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्या जेणे करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यास मदत मिळेल व विद्यार्थी शिक्षणापासून वंचित नराहता देशाच्या प्रगतीत मोलाचं वाटा घेतली, या अनुशंगाने सदर योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना व्हावा, अश्या आशयाचे सूचना विभागीय उच्च शिक्षण सह संचालक डॉ. संजय ठाकरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.