<
पाचोरा-(प्रतिनीधी) – सुरेन्द्र मोरे हे दलित समाजाचे एक अभ्यासू व प्रामाणिक नेते असून 2004ला त्यानी बसपा च्या तिकिटावर पारोळा भडगाव मतदार संघात मातब्बर नेते समोर निवडणूक लढविली होती , त्यानंतर त्यानी 2009ला पाचोरा भडगाव विधान सभेतूण अपक्ष अर्ज दाखल केला होता , परंतु त्यानी मा दिलीप वाघ याच्यां साठी माघार घेऊन त्यांना पाठिंबा देऊन खेडोपाडी पिंजून दलित वस्त्या मध्ये जाउन मतदार यांना जाग्रूत करून दिलीप भाऊ वाघ यांना मदत केली , या वेळीच त्यांना रिडालोस च तिकीट हि मिळणार होत पण शेवटी काय झाल हे अनेक नेत्यांना ठाऊक आहे ,समाजाचे आपण देने आहोत या हेतूने त्यानी पुन्हा 2014चि निवडणूक बसपा च्या तिकिटावर लढविली ‘एक विधानसभा निवडणूक लढविण्याचा चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी असून तळागाळातील समाज विविध सामाजिक संघटना यात त्यांचे नाव प्रामाणिक कार्यामुळे घेतले जाते , त्या सघंटणाचे प्रतिनिधी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहतात ‘ आणी जर सुरेन्द्र मोरे यानीही उमेदवारी केल्यास या वेळी पुन्हा दलितांची मतांची 100%विभागणी होणार हे निश्चितच आहे ‘ होतकरू ‘ आशावादी आणी सर्व थरातून परीचय अशि ओळख आहे ‘ विशेषत तरुण वर्ग त्यांचा चाहता आहे. पण सुरेन्द्र मोरे हे सध्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कामगार नेते आहेत ‘ त्यांना सम्पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या प्रामाणिक व स्वाभिमानी कार्यामुळे ओळखतो ‘पण यांना या विधान सभेत का पक्षीय उमेदवार कडून विश्वासात घेतले जात नाही,अनेक दलित चळवळीतील नेते उमेदवारी साठी त्याच्यां संपर्कात असल्याच बोलले जात आहे, त्याचच आज त्यानी घेतलेले नॉमिनेशन पत्र सांगत असावे , हि बाब पक्षासाठी आणी उमेदवार साठी घातक आहे , आता येणारा काळ व वेळच सांगेल काय होतं.