जळगाव दि.२ प्रतिनिधी – जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव तर्फे शासकिय महाविद्यालयात सिविल हॉस्पिटल येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप केले. यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान, बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी मिश्रा, इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. शैलजा चौहान यांनी स्तनपानाविषयी माहिती दिली. बाळाला आईचे दूध किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. लहान बाळा स्तनपान करताना आईने कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी सांगितले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा उषा जैन यांनीही मनोगत व्यक्त करुन क्लबविषयी होणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, सीसी रंजन शहा, तृप्ती चौबे, उज्वला टाटिया, ज्योत्स्ना रायसोनी,राजश्री पगारिया, डॉ मेघना तोतला,रोहिणी मोरे, तनुजा मोरे, आबिदा काझी, निता जैन, डॉ रितु कोगटा,दीप्ति अग्रवाल, प्रतिभा छाबडा,आरती सोनी,निकिता अग्रवाल यांच्यासह इनर व्हील क्लबच्या सदस्यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.