जळगाव दि. 2 ( जिमाका ) डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2024-25 ज्या मदरसांमध्ये पारंपारिक धार्मिक शिक्षण देण्यात येते आणि पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी,व उर्दु या विषयाचे शिक्षण देण्यात येत असलेल्या आणि ज्यांना आधुनिक शिक्षणाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरशांकडून अर्ज करण्याचे जिल्हा नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे.
या मदरसा/मदरसे चालविणा-या संस्था धर्मदाय आयुक्त तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जळगांव जिल्हयातील इच्छुक मदरशांनी शासन निर्णय क्र. अविवि-2010/प्र.क्र.152/10/का.6/दि.11.10.2013 तसेच शासन निर्णय क्र. अधिवि-2023/प्र.क्र.77/का.6, दिनांक 22.12.2023 च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे दिनांक 15.09.2024 पर्यंत सादर करावे विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.
शासन निर्णयक्र.अविवि-2010/प्र.क्र.152/10/का.6/ दि.11ऑक्टोबर, 2013 तसेच शासन निर्णय क्र. अधिवि-2023/प्र.क्र.77/का.6, दिनांक 22.12.2023 अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्तळावर उपलब्ध आहे. इच्छुकांनी हा अर्ज करावा.