<
नाशिक : ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांनी मुक्त विद्यापीठास शासनाची अमळनेर येथील 2 एकर जागा गट नंबर ३७६/१ येथे विद्यापीठास उपलब्ध करून दिली आहे.
सदर उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9.00 वाजता अमळनेर-धरणगाव रोड, अमळनेर, जळगाव येथे मा. ना. श्री. चंद्रकांत (दादा) पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमास मा. ना. श्रीमती रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्यमंत्री, क्रीडा व युवा कल्याण, भारत सरकार यांची मुख्य उपस्थिती असणार आहे.
त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. श्री. गिरीश महाजन, मंत्री, ग्रामविकास आणि पंचायती राज व पर्यटन. मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता, तथा पालकमंत्री, जळगाव. मा. ना. श्री. अनिल पाटील, मंत्री, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. तसेच मा. खा. श्रीमती स्मिताताई वाघ, मा. आ. श्री. एकनाथराव खडसे, मा. आ. श्री. किशोर दराडे, मा. आ. श्री. सत्यजित तांबे, मा. आ. श्री. चिमणराव पाटील, मा. आ. श्री. संजय सावकारे, मा. आ. श्री. शिरीष चौधरी, मा. आ. श्री. सुरेश भोळे, मा. आ. श्री. किशोर पाटील, मा. आ. श्रीमती लताबाई सोनवणे, मा. आ. श्री. चंद्रकांत पाटील, मा. आ. श्री. मंगेश चव्हाण, मा. जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे हे असणार आहे, अशी माहिती मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, विभागीय संचालक डॉ. प्रमोद रसाळ यांनी दिली.
सदर उपकेंद्रामुळे खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील वंचित दुर्लक्षित घटकांना कला शाखा, कॉमर्स, विज्ञान व २५० च्या वर प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम, तसेच कौशल्य विकास शिक्षणक्रमाच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे. या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ या विद्यार्थ्यांना होणार आहे.