Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/09/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ उत्साहात संपन्न

जळगाव दि.२३ (प्रतिनिधी)- जळगाव शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आणि जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती स्कूल द्वारे सहआयोजित जळगाव म. न. पा. आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ मधील १४, १७ आणि १९ वर्षाआतील गटामधील मुलं व मुलींची बॅडमिंटन स्पर्धा पार पडल्यात. अनुभूती निवासी स्कूल येथील बॅडमिंटन हॉल येथे १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा झाली.

या स्पर्धेत शहरातील शाळांमधील १४, १७, १९ वर्षे वयोगटातील मुले व मुलींच्या २० संघांचा समावेश होता. या स्पर्धेत ५० संघांचे २५० खेळाडूंचा सहभाग नोंदविला. स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लि. तर्फे क्रमश: गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रीडासमन्वयक रवींद्र धर्माधिकारी, अनुभूती निवासी स्कूल शाळेचे व्यवस्थापक विक्रांत जाधव, भिकन खंबायत, जैन स्पोर्ट्स अॅकडमी फुटबॉलचे प्रशिक्षक श्री मोहसीन व मुख्य पंच दीपिका ठाकूर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय संघांना जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड द्वारे प्रायोजित गोल्ड, सिल्वर आणि कास्य पदक देण्यात आले. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले.

स्पर्धेचा निकाल
१४ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल द्वितीय क्रमांक – पोदार इंटरनेशनल स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१४ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – महाराणा प्रताप हायस्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१७ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – ओरियन स्कूल (स्टेट बोर्ड), द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१७ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – सेंट जोसेफ कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय क्रमांक – सेंट लॉरेन्स कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल
१९ वर्षा आतील मुलांचे संघ गटात प्रथम क्रमांक – धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, द्वितीय क्रमांक – एम. जे. कॉलेज, तृतीय क्रमांक – बबन बाहेती महाविद्यालय
१९ वर्षा आतील मुलींचे संघ गटात प्रथम क्रमांक – एम. जे. कॉलेज, द्वितीय क्रमांक – सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक – नूतन मराठा महाविद्यालय.

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर व पंच म्हणून नमन जैन, ईशांत साळी, रजत पटेल, फाल्गुन पाटील, शांतनू फालक, संस्कार, अंकित कोळी, देवेंद्र कोळी, अनामय जोशी, फाल्गुनी पवार, तेजश्री शुक्ल, हमजा खान, मिहिर कुलकर्णी, रीत नाथांनी, शुभम चांदसरकर, करण पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक किशोरसिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनात विकास बारी, शुभम पाटील, पूनम ठाकूर, राखी ठाकूर, जाझीब शेख, मशरुख शेख यांनी परिश्रम घेतले. सहप्रशिक्षक दिपिका ठाकुर यांनी आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

निधन वार्ता-सौ.शोभा गोपाळराव पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Next Post

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

Next Post
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा  एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर;पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d