<
केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता छात्रअध्यापक मन्यार यांनी गरजू,गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत इंग्लिश स्पीकिंग पुस्तकाचे केले वितरण
जळगांव(प्रतिनीधी)- येथील शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात आंतरवाशीता छात्र अध्यापकांच्या “निरोप समारंभ” आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका राजश्री महाजन हे होते, प्रमुख पाहुणे प्रा. डाॅ. शैलजा भंगाळे, प्रा. डाॅ. प्रतिभा पाटील हे होते.कार्यक्रमाची सुरूवात विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांनी प्रा. डाॅ. शैलजा भंगाळे, प्रा. डाॅ. प्रतिभा पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांचा आभार मानले. मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले होते. शिक्षक ए.ए सुरवळकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की शिक्षक समाजात महत्वाची भूमिका निभावतो. शिक्षणातून माणसाचे भवितव्य घडते. भावी शिक्षकांनी सदैव कार्यरत असणे आवश्यक आहे. सुरवळकर यांनी विविध उदाहरणे देऊन भावी शिक्षक कसा असावा? यावर महत्त्वपूर्ण विचार विषद केले.केसीई शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे आंतरवासिता छात्रअध्यापक असलम मन्यार यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील महत्त्वावर प्रकाश टाकत इंग्रजीतुन गाणी गायले. असलम मन्यार यांनी इंग्रजी विषयाचे स्पर्धेचे निकाल जाहीर करत गरजू,गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत ‘इंग्लिश स्पीकिंग’ पुस्तकाचे वितरण केले. या स्पर्धेत इयत्ता सातवी ची विद्यार्थ्यांनी मयुरी विजय दंडवार (प्रथम क्रमांक) , दुर्गा राजेश गोसावी (व्दितीय क्रमांक) अश्विनी राजेश आडवाल (तृतीय क्रमांक) तसेच इयत्ता आठवीचे विद्यार्थी कृणाल जितेंद्र पाटील(प्रथम क्रमांक ),लक्ष्मी संतोष रायमळे (व्दितीय क्रमांक) , ललिता संतोष कोळी (तृतीय क्रमांक). तसेच इयत्ता दहावीचे विद्यार्थी निवृत्ती संजय चव्हाण (प्रथम क्रमांक ), रोहिणी लालचंद मोरे (व्दितीय क्रमांक ),किशोर गणेश बारी (तृतीय क्रमांक) पटकाविले. विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत सहभागी होवून पारितोषिक मिळविले. विद्यार्थ्यांनी यावेळी नृत्य सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकून कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका राजश्री महाजन यांनी आंतरवाशीता छात्र अध्यापकांच्या छात्र सेवा कार्याचा कौतुक करीत भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी तर आभार सोनाली देवकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एल पी चौधरी यांनी परिश्रम घेतले. यावेळी डि.वाय फिरके, हर्षा चौधरी, प्रतिभा चौधरी, योजना चौधरी, खगेश्वरी पाटील आंतरवाशीता छात्र अध्यापक मिलींद महाजन, देवानंद धुंधाले, दिव्या मकवाने, सरिता नाईक, शांता पाडवी, कांतीलाल पाडवी, रूबिना तडवी, लक्ष्मी कवळे आदींसह मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.