<
जळगाव दि. १४ प्रतिनिधी – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गांधी जयंती निमित्ताने ऑनलाईन राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. इ. ६ वी ते ८ वी, ९ वी ते १२ वी, प्रथम वर्ष ते पदव्युत्तर व खुला गट अशा चार गटात हि स्पर्धा घेण्यात आली. यशस्वी स्पर्धकांना शालेय गट अनुक्रमे रु. ५०००/-, ३०००/-, २०००/-, शालेय गट २ अनुक्रमे रु. ७०००/-, ५०००/-, ३०००/- महाविद्यालयीन व खुला गट अनुक्रमे रु. १००००/-, ७०००/- व ५०००/- रकमेची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरातून ३१७ विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयावर ४ मिनिटांचे व्हिडीओ तयार करून पाठविले होते.
सर्व व्हिडिओंचे दोन स्तरावर परीक्षण करण्यात आले. त्यातून अंतिम मूल्यांकनासाठी दहा स्पर्धकांची निवड करण्यात आली. अंतिम विजयी प्रथम तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके देण्यात येणार असून अंतिम मूल्यांकनासाठी निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना विशेष गुणवत्ता प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अंतिम निकाल खालीलप्रमाणे –
*शालेय गट १* – प्रथम – आकांक्षा वानोळे (श्री वारणा विद्यालय, वारणानगर), द्वितीय – दिव्या जवळे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, पुरजळ जि. हिंगोली), तृतीय – कार्तिक प्रमोद जैन (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)
*शालेय गट २* – प्रथम – सृष्टी थोरात (एस. जी. श्रॉफ ज्यू. कॉलेज, नंदुरबार), द्वितीय – दिती दवे (एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले), तृतीय – कस्तुरी पाटील (चावरा इंग्लिश मिडीयम स्कुल, नंदुरबार)
महाविद्यालय गट – प्रथम -आयुषी केनिया (सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात), द्वितीय – निशांक दुबे (के. जी. जोशी कॉलेज ऑफ आर्टस्, ठाणे), तृतीय – कावेरी लांडगे (जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, नागपूर)
खुला गट – धारणी एस. के. (तामिळनाडू), श्रीश्रेष्ठ नायर (मुंबई), गौरव चव्हाण (वर्धा)
सर्व यशस्वी स्पर्धकांचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त अशोक जैन यांनी अभिनंदन केले असून स्पर्धकांनी विविध विषयांवर मांडलेले विचार अभ्यासपूर्ण आहेत. महात्मा गांधीजींच्या विचारांचा अवलंब नवीन पिढी करीत आहे हे आशादायी असून पद्मश्री भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचा उद्देश सफल होत असल्याचे समाधान वाटते असेही त्यांनी म्हटले आहे.