जळगाव – (प्रतिनिधी) – लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव च्या “इनोव्हेशन आणि इनक्युबॅशन” कक्षाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता निर्माण व्हावी या उद्देशाला धरून आज महाविद्यालयाचा विद्यार्थी ऋषिकेश माळवतकर याच्या ऋषिकेश ऑनलाईन सर्विसेस चे उद्घाटन महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. यशवंत महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. ऋषिकेश ऑनलाईन सर्विसेस मार्फत आधार कार्ड, इलेक्शन कार्ड विविध योजनांचे ई फॉर्म भरणे पासपोर्ट काढणे अशा अनेक प्रकारच्या ई सुविधा महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक तसेच परिसरातील नागरिकांना पुरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्रोफेसर उमेश वाणी, डॉ. शाम सोनवणे, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिता चौधरी डॉ. भारती गायकवाड डॉ. अशोक हनवते डॉ. योगेश महाजन डॉ. निलेश शांताराम चौधरी कार्यालयीन अधीक्षक श्री धनंजय महाजन डॉ. जुगल घुगे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.