<
जळगाव दि. २१- केसीई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि रिसर्च जळगावच्या एमबीए, एमसीए आणि आयएमसीएच्या १३५ विद्यार्थ्यांनी १० प्राध्यापकांसह पुण्यातील हिंजेवाडी स्थित इन्फोसिस कंपनीचा उद्योग दौरा केला. विद्यार्थ्यांनी इन्फोसिसच्या पुणे कार्यालयात माहिती तंत्रज्ञान, डेटा अॅनालिटिक्स, आणि प्रकल्प व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांबद्दल सखोल माहिती मिळवली. तंत्रज्ञानाच्या वापराने उद्योगात होणारे बदल आणि आयएमआरच्या विद्यार्थ्यांसाठी जॉबच्या नवीन संधींवरही इन्फोसिस बीपीएमचे राष्ट्रीय हेड आशिष कपूर ह्यांच्याशी चर्चा करण्यात आली. या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील प्रत्यक्ष अनुभव आणि नवीन तंत्रज्ञान, कौशल्ये आणि कामकाजातील व्यावसायिक वातावरणाची माहिती मिळवणे हा होता.
इन्फोसिस दौऱ्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्याजवळील रांजणगाव आणि आळंदी येथेही भेट दिली. रांजणगाव येथील प्रसिद्ध गणपती मंदिर आणि आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वाची अनुभूती घेतली. ह्या दौऱ्याचे संपूर्ण संयोजन ट्रेनिंग एंड प्लेसमेंट हेड प्रा. पुनीत शर्मा ह्यांनी केले.
दौऱ्यातील प्राध्यापकांमध्ये प्रा. धनश्री चौधरी, प्रा. यामिनी भाटिया, प्रा. रुपाली नारखेडे, प्रा. कविता पवार, प्रा. वर्ष झनके, प्रा. सेजल नेहेते, प्रा. प्रकाश बारी, प्रा. सतीश दमाडे आणि प्रा. वैभव चतुर्भुज शामिल होते. कंपनी तर्फे तेजश्री तोडणकर ह्यांनी कामकाज पहिले.