<
लोहारा ता. पाचोरा जि.जळगाव (रिपोर्टर ईश्वर खरे)
सध्या दिवाळीच्या सणाचे दिवस आहेत. त्यामुळे ग्राहकांची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. दरम्यान याच काळात जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढल्यामुळे महागाईने भडका घेतल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे.
दिवाळी म्हणजेच सणांचा राजा. तर दिवाळी हा सण आगामी पाच ते सहा दिवसांवर येऊन ठेपलेला आहे.सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव म्हणजे दिवाळीअसे समजले जाते .तर दिवाळीलाच जीवनावश्यक वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते या काळात दरवर्षीच जीवनावश्यक वस्तूच्या भावात वाढ होत असते.दिवाळी त सूर्यफूल तेल ,तूर डाळ, तीळ, खोबरे ,रवा, मैदा ,हरभरा डाळ ,चणा डाळ, उडीद डाळ,मुंग डाळ ,मसूर डाळ, पोहे ,मुरमुरे ,ड्रायफ्रूट्स ,गुळ, शेंगदाणे ,रवा ,तूप, या वस्तूचे भाव वाढलेले आहेत या वाढलेल्या भाव वाढीमुळे सर्वसामान्य परिवारात बजेट मात्र कोलमडलेलं आहे. यातच तेलाचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींच्या घर खर्चाचे बजेट ही कोलमडलेले आहे.
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका
अशी आहे जीवनावश्यक वस्तूची गगन भरारी!
याच सोयाबीन तेल 135 ते 140,सूर्यफूल तेल 140 ते 145,खोबरे 240,रवा 45,मैदा 45 ,हरभरा डाळ 100,तुरडाळ 160,साखर 40 ते 42 प्रति किलोला मिळत आहे .काही वस्तूचे भाव सव्वा पट तर काही दीडपटीने वाढले आहेत .जीवनावश्यक असणाऱ्या सर्वच वस्तूच्या भाववाढीने जनता मात्र त्रस्त दिसून येत आहे.