<
कचरा उचलण्यासाठी लागणार्या पिशव्या मनपा आयुक्तांकडे सुपूर्द
जळगाव-(प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून जळगाव मनपामार्फत शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणार्या एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेने पुढाकार घेतला असून स्वच्छता अभियानासाठी आवश्यक असलेल्या पिशव्या मंगळवारी मनपा आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
जळगावात मनपातर्फे दि.2 पासून स्वच्छता अभियान हाती घेण्यात येणार आहे. स्वच्छता अभियानात कचरा संकलन करण्यासाठी मोठमोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यांची आवश्यकता भासणार आहे. एकता रिटेल किराणा मर्चंटस पतसंस्थेच्या माध्यमातून या अभियानाला हातभार लावण्यात येणार आहे. कचरा संकलन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 1 हजार पिशव्या पतसंस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया यांच्या हस्ते मंगळवारी मनपा आयुक्त उदय टेकाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या.
एकता पतसंस्थेच्या हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात मनपा आयुक्त टेकाळे यांनी, प्रत्येक जळगावकराने स्वच्छता अभियानात सहभागी होऊन आपले शहर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष ललित बरडीया यांनी, आपले शहर स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी असून प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी चोखपणे पार पाडल्यास शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल असे सांगितले.
यावेळी व्यासपीठावर मनपाचे अधिकारी उदय पाटील, पतसंस्थेच्या सीईओ प्रणिता कोलते उपस्थित होते. प्रसंगी शांतीलाल नावरकर, विजय कुकरेजा, मयुर चावला, माधुरी बिर्हाडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी चंद्रकांत आहुजा, किशनचंद आहुजा, योगेश चिंचोले, विनोद केसवाणी, सुभाष कांकरीया, वैशाली पाटील, प्रतिभा ठाकरे, प्रविण कोतकर, हर्षा कुलकर्णी, राधिका ठाकुर, देसाई, किरण माहेश्वरी, हर्षाली देवरे, प्राजक्ता अवचार, कल्पना पाटील, सुभाष साळुंखे, किसन कदम, यांनी परिश्रम घेतले.