<
जळगाव – (प्रतिनिधी) – हिंदू धर्मियांचा पवित्र समजणारा सण दिवाळी सुरू झाला असून त्यात सर्व समाज बांधवांनी आनंद घ्यावा या हेतूने प्रेरित होऊन जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरीने दिव्यांग साधना संघराज्य अध्यक्ष विठ्ठल पाटील व जिल्हाध्यक्ष महेंद्र वानखेडे यांच्याशी संपर्क साधून जे अत्यंत क्रियाशील व गरजवंत आहे अशा १० सहकाऱ्यांना दिवाळीचा शिधावाटप (प्रत्येकी ११००/- रू) मनीयार बिरादरी च्या रथ चौक येथील कार्यालयात करण्यात आला.
शिधा मध्ये या वस्तूंचा समावेश
तूप, तेल, शेंगदाणे, तूरदाळ, चनादाळ व मुंग दाळ प्रत्येकी एक किलो, गहू पाच किलो, मिठाई मध्ये सोनपापडी व फरसाण ५०० ग्रॅम या वस्तूंचा समावेश आहे.
दीव्यांग साधना संघाचे या १० सहकाऱ्यांना देण्यात आले शिधा
विठ्ठल पाटील, महेंद्र वानखेडे, नंदू ठोंबरे ,मीराबाई पाटील, समाधान हरसावडे, किसन बांडे, युवराज चौधरी, विजय तुरसाम, नारायण महाजन व सचिन कडू मिस्तरी
मानवता व एकतेचा संदेश
सर्वप्रथम मुस्लिम मन्यार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख यांनी दिव्यांग साधना संघाच्या सहकाऱ्यांशी चर्चा करताना अंतिम प्रेषितांच्या आदेशा नुसार जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी आपणास सहकार्य करीत आहे यात कोणत्याही प्रकारे आपल्यावर आम्ही उपकार करीत नसून तो आमचा कर्तव्याचा एक भाग आहे त्यामुळे आपण ईश्वर – अल्ला कडे एकच प्रार्थना करा की आम्हास सर्वांना या सृष्टीमध्ये सुखाने व आनंदाने ठेव, एकमेकास अवघे धरू सुपंथ याप्रमाणे जगण्याचा मंत्र दे असे बोलून त्या सर्व दिव्यांगाचे आभार मानले.
यावेळी बिरादरीचे उपाध्यक्ष सैय्यद चांद, सहसचिव अब्दुल रऊफ ,शिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, आसिफ खरादी व शकील खाटीक आदींची उपस्थिती होती.