<
पिंप्री पंचायत समिती गणांत शिवसेनेच्या प्रचाराचा धुराळा : ग्रामस्थांमध्ये उत्साह
धरणगाव/जळगाव – (प्रतिनिधी) – सोनवद व पिंप्री पंचायत समिती गणांतील निंभोरा, दहिदुला, चिंचपुरा, मुसळी, वाघळुद, अंजनविहीरे – हनुमंतखेडा – पिंपळेसिम – बोरखेडा – चिंचपुरा परिसरात गुलाब भाऊंनी सिंचन बंधारे, नदीवरील तीन पूल, शेत पानंद रस्ते, ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, गावांतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण अशा विविध कामांतून विकासाची नवी परिमाणे निर्माण केली आहेत. पर्यटनातून वाघळूद तीर्थक्षेत्राला निधी देत, विकासाचा प्रत्येक अंगाने विस्तार केल्यामुळे तसेच गुलाबराव पाटील यांनी जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन, सर्व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन एकजुटीने विकास कामे केली आहेत. त्यामुळे जाती- पातीला थारा न देणाऱ्या गुलाब भाऊंच्या धनुष्यबाणाचा जनतेमध्ये विचार होतांना दिसून येत आहे. या परिसरातील सरपंचांसह ग्रामस्थांनी व कार्यकर्त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांना कार्यकर्त्यांचा ठोस पाठींबा दिला. गुलाबराव पाटील यांच्या भव्य अश्या प्रचार रॅलीत धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक निघत असून त्यांच्या सोबत महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘धनुष्यबाणाचा’ झंझावाती प्रचार करून प्रचंड मतांनी विजयाचे आवाहन करीत आहे.*
सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य झाले एकत्र
यावेळी या भागातील सरपंच सुरेश पाटील, सुदर्शन पाटील, भैय्या पाटील, कैलास पाटील, सुखदेव पाटील, सुरेश गुंजाळ यांच्यासह उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य एकत्र येवून गुलाबराव पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचा केला ठाम निर्धार केला आहे.
प्रचार रॅलीत घरोघरी मतदारांना भाजपाचे पी. सी. आबा पाटील, सुभाषआप्पा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे, सेनेचे संजय पाटील सर, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, रॉ.काँ. चे श्यामकांत पाटील, नाटेश्वर पवार, दिनेश पाटील, राजू पाटील, दामूअण्णा पाटील , माजी सभापती अनिल पाटी, प्रेमराज पाटील , रवींद्र चव्हाण सर, रवींद्र पाटील, रोहिदास पाटील, नाना बोरसे, शिवदास कुमावत, भरत कुमावत, रामकृष्ण पाटील, सरिता ताई कोल्हे – माळी कोल्हे, कल्पनाताई अहिरे, पांडुरंग कोळी, अशोक कोळी, सुभाष कोळी, कैलास कोळी, विष्णू पाटील, रमेश पाटील, बाळू गुरुजी, रामकृष्ण पाटील, तुकाराम पाटील, गजानन बापू पाटील , दिलीप भाऊ, प्रकाश आप्पा पाटील, विकास भाऊसाहेब, भगवान आप्पा पाटील, व्ही.डी. पाटील, नंदू बाबा पाटील, हुकुमचंद पाटील, ईश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील, मोहन पाटील, गोकुळ नाना पाटील, राधेश्याम पाटील, संतोष पाटील, नामदेव पाटील, नानाभाऊ पाटील, बंडू पाटील, समाधान पाटील, सुदर्शन पाटील, धनराज नाईक यांच्यासह या परिसरातील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जनतेला आवाहन केले.