<
चाळीसगाव – (प्रतिनिधी) – विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांना समाजातील सर्व स्तरांतून व्यापक समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे. अतिशय नियोजन पद्धत पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून त्यांनी त्यांच्या अनोखा पॅटर्न निर्माण केला आहे. शहरातील नागरिकांनी देखील विकास कामांना प्राधान्य विकास कामांसाठी विकास करणाऱ्या माणसाच्या मागे उभ्या राहण्याचा निर्धार केला आहे. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी संपूर्ण शहरातून आपला संवाद कार्यक्रम राबविला असून गल्लोगल्ली त्यांचे भव्य स्वागत व त्यांच्या निर्णयांचे देखील जनतेतून कौतुक होत आहे. त्यांच्या जोडीला महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.
चाळीसगाव शहरामध्ये भारतीय जनता पार्टी व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रचार यंत्रणांचा पुरेपूर वापरामुळे चाळीसगाव मध्ये सर्वत्र कमळाचाच बोलबाला असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे रोज नवनवीन कार्यकर्ते विशेषता तरुण कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने प्रवेश करत आहेत. त्याचा निश्चितच लाभ आमदार मंगेश चव्हाण यांना होणार असल्याचे दिसते.
त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना व समाज बांधवांनी देखील आमदार मंगेश दादा यांना पाठिंबा देत समर्थन दर्शविले आहे. एकंदरीत आमदार मंगेश चव्हाण यांचा यांना समाजातील सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विकास कामांमुळे आमदार मंगेश चव्हाण यांचा विजय निश्चित असल्याचे जनतेत बोलले जात आहे.
आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी शहरी भागाचा संपूर्ण दौरा पूर्ण केला असून आता ग्रामीण भागाकडे त्यांनी आपला प्रचाराचा मोर्चा वळवला आहे, यापूर्वी देखील त्यांनी ग्रामीण भागात संवाद साधला होता. आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्याबरोबर सौ. प्रतिभाताई चव्हाण यांनी देखील स्वतंत्र यंत्रणा राबवली आहे. महिलांचा व्यापक सहभाग हा देखील आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रचार यंत्रणेतील लक्षणीय ठरला आहे. तसेच सर्वसामान्य जनतेही आमदार मंगेश चव्हाण यांचे नाव असल्याने चाळीसगावात कमळाचाच बोलबाला दिसून येत आहे त्यामुळेच की काय चाळीसगावकरांणी विकासाला साथ देण्याचा निर्धार केला असल्याचे दिसून येते.
विकासकामांविषयी नागरिक जो आनंद व्यक्त करत आहात, त्याचं समाधान मला प्रेरणादायी आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले प्रयत्न नागरिकांच्या सहकार्यानेच शक्य झाले आहेत. नागरिकांच्या विश्वासाचा आणि सहकार्याचा आधार घेत, शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी अजून जोमाने काम करण्यासाठी मी बांधील आहे* :-.” आमदार मंगेश रमेश चव्हाण.
———————————————–