Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शहीद स्मारकामध्ये पिंपळाच्या रोपांची लागवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव, दि. 2 – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त येथील डॉ. शामप्रसाद मुखर्जी उद्यानातील शहीद स्मारकामध्ये राष्ट्रीय हरीत सेना, सामाजिक वनीकरण, जळगाव वनविभाग, जळगाव तसेच मातृभुमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने चार पिंपळाच्या रोपांची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

            राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शहीद स्मारकाजवळ आज चार पिंपळाची झाडे लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  महात्मा गांधी यांनी 1936 साली वर्धा येथील पवनार आश्रमात पिंपळाचे झाड लावले होते. या झाडाच्या बियांपासून तयार केलेली पिंपळाची रोपे यासाठी येथे आणण्यात आली आहेत. यावेळी सन 1955 च्या गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक शांतारामजी वाणी, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या हस्ते या चार वृक्षांची लागवड करण्यात आली.

            याप्रसंगी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, विभागीय वन अधिकारी एस. आय. शेख, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसीलदार वैशाली हिंगे, वन परिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील, भास्कर भोळे, नरेंद्र जावळे, बी. बी. जोमीवाले, पी. टी. वराडे, गोपीचंद सपकाळे यांच्यासह जिजामाता विद्यालयाचे हरीत सेनेचे विद्यार्थी, मातृभुमी सर्वांगीण विकास संस्थेचे पदाधिकारी, सामाजिक वनीकरण, महापालिका व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

            याचबरोबर जिल्ह्यातील शहीद स्मारक, आडगाव, ता. एरंडोल, शहीद स्मारक, पाचोरा, शहर वाहतुक शाखा, जळगाव, शहीद राकेश शिंदे स्मारक, जामनेर रोड, भुसावळ, शहीद नरेंद्र महाजन स्मारक, जुना सातारा चौफुली, भुसावळ, शहीद स्मारक नागलवाडी, ता. चोपडा येथेही पिंपळाचे वृक्ष लावण्यात आल्याची माहिती विभागीय वन अधिकारी श्री. शेख यांनी दिली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंध-अपंग मुलांसमवेत वाढदिवस साजरा करून पुन्हा एकदा राहुल ला दिले आशीर्वाद

Next Post

स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

Next Post
स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

स्वच्छता ही सेवा अभियानातंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात आली स्वच्छता मोहिम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo