Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेला श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/11/2024
in क्रीडा, जळगाव
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय शालेय सेपक टकरा क्रीडा स्पर्धेला श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात

12 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत स्पर्धेचे आयोजन

जळगाव दि.12 ( जिमाका )- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा सेपक टकारा असोसिएशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर शालेय सेपक टकरा (17 व 19 वर्षे मुले / मुली ) क्रीडा स्पर्धा 2024- 25 चे आयोजन दि. 12 ते 14 नोव्हेंबर, या कालावधीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आले आहे.

या स्पर्धेत राज्यातील मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, लातुर, संभाजीनगर, कोल्हापूर व नाशिक असे एकूण आठ विभागातुन 17 व 19 वर्षे गटातील जवळजवळ 200 खेळाडू तसेच खेळाडूंसोबत संघ व्यावस्थापक, मार्गदर्शक, तांत्रिक अधिकारी आणि स्वंयसेवक स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. सदर स्पर्धेतून महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींचा संघ निवडण्यात येणार असून पुढे तो संघ शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
आज 11 वाजता या स्पर्धेचे उदघाटन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त – श्री. प्रदीप तळवेलकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त – श्रीमती अंजली पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. रविंद्र नाईक, महाराष्ट्र सेपक टाकरा संघटनेचे उपाध्यक्ष श्री हनुमंत लुंगे, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव श्री राजेश जाधव, जिल्हा विधीसेवा विभाग व समुपदेशक ॲड. श्रीमती भारती कुमावत , ॲड. ऐश्वर्या मंत्री, श्री. इकबाल मिर्झा, श्री. आसिफ मिर्झा, तालुका क्रीडा अधिकारी श्री. जगदीश चौधरी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

तसेच सदर कार्यक्रमा प्रसंगी श्री. सचिन निकम- क्रीडा अधिकारी, श्री. सुरेश थरकुडे – क्रीडा अधिकारी, श्री. मिनल थोरात क्रीडा मार्गदर्शक, श्रीमती चंचल माळी क्रीडा मार्गदर्शक, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री. आसिफ मिर्झा यांनी केले तर आभार श्री. किशोर चौधरी, क्रीडा मार्गदर्शक यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मतदार जनजागृती मोहिम अंतर्गत डिजिटल चित्ररथास प्रारंभ;मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दाखविला हिरवा झेंडा

Next Post

के सी ई सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात पॉलीटेकनिक मध्ये पालक सभा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo