<
माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले “विजयी भव” चे आशीर्वाद
जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील राजकारणात चाणक्य समजले जाणारे माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी, “मग येणार ना मंत्री बनून”अशा शब्दात विचारणा करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांना मिठाई भरवून विजयासाठी आशीर्वाद दिले. गुरुवारी सकाळी पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांना गणपती नगर, रामेश्वर कॉलनी भागांमध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
आ. राजूमामा भोळे यांनी गुरुवारी सकाळी गणपती नगरातील श्री गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील रॅलीला सुरुवात केली. तेथून गणपती नगर, आदर्श नगर, जीवन मोती सोसायटी, रामेश्वर कॉलनी, विश्वकर्मा नगर, राजपूत गल्ली मार्गे स्वामी समर्थ चौकात समारोप केला. दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनी रॅली मार्गात माजी महापौर प्रदीप रायसोनी, माजी खासदार ईश्वरबाबू जैन, उद्योजक यशवंत बारी, माजी नगरसेविका रेखा पाटील, ज्योती चव्हाण, सदाशिवराव ढेकळे, राजेंद्र घुगे पाटील आदी मान्यवरांच्या घरी भेट दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनीष जैन यांनी काही काळ प्रचारात सहभाग घेतला. सिंधी समाजाचे प्रार्थनास्थळ प्रेम प्रकाश आश्रम येथे भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले. महाराजांनी शाल अंगावर टाकून सत्कार करीत आशीर्वाद दिले.
रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख विशाल त्रिपाठी, शिवसेनेचे पदाधिकारी माजी महापौर ललित कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजपचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, रेखा पाटील, राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेच्या ज्योती चव्हाण, भाजपचे अनिल देशमुख, भाजप मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला महानगराध्यक्ष मीनल पाटील, भाजपचे गौरव ढेकळे, मधुकर ढेकळे, पृथ्वीराज सोनवणे, महेश कापुरे, महेश जोशी, राहुल वाघ, आशुतोष पाटील, राहुल कुलकर्णी, विनोद मराठे, प्रकाश बालाणी, वैशाली पाटील, रेखा कुलकर्णी, शोभा कुलकर्णी, माधुरी देशमुख, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, कुंदन काळे, पियुष कोल्हे, उमेश सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक लता मोरे, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, अक्षय मेघे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.