<
सुमारे २०० कोटींच्या निधीतून नशिराबादचा होत आहे कायापालट
नशिराबाद/जळगाव – (प्रतिनिधी) – खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत राऊत हा तिकीट विकणारा माणूस आहे, जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले गेले की काय ? आणि जे इच्छुक होते त्यांना कुणाला नगराध्यक्ष कोणाला महामंडळाचे गाजर दिले असेल परंतु मी विकासाच्या नावावर मते मागणारा माणूस आहे जाती – पाती पेक्षा विकास कामाला महत्व देवून तळागाळातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करून सर्वसमावेशक विकास केला आहे. राजकारणातला माझा बाप एकच तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे असून “धनुष्यबाण’ माझी आण, बाण आणि शान आहे. यांच्यासारखा गांडू धंदा मी करत नाही अशा शब्दात संजय राऊत यांची खिल्ली उडवली. हे जळगाव शहराचे पार्सल आता जळगाव ग्रामीण मधून हद्दपार करून धनुष्यबाणाला मतदान करून आपली मतपेट ही नशिराबादचे विकासाचे भविष्य घडविणारी असून नशिराबादाचा चेहरा – मोहरा बदलवून संपूर्ण कायापालट करणारच अशी ग्वाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबाद येथील जाहीर सभेत केले.
ते पुढे म्हणाले की, नशिराबादमध्ये दिलेल्या शब्दाला जागून नव्या नगर परिषदेची स्थापना देखील केली. याचबरोबर विविध विकास कामांसाठी सुमारे 200 कोटींच्या निधीची तरतूद केली. या निधीतून शहराचा विकास करण्यात येत असून, नशिराबादच्या चेहऱ्याला नवसंजीवनी मिळाली आहे. यामध्ये 60 कोटींची पाणीपुरवठा योजना, 61 कोटींची भुयारी गटार योजना, झेंडुजी महाराज मंदिरासाठी 5 कोटी, भवानी मंदिर परिसर विकासासाठी 2.5 कोटी, नशिराबाद ते सूनसगाव आणि विविध गावांपर्यंतच्या रस्त्यांसाठी 15 कोटी, नगरपालिकेची नवीन इमारत, नवीन स्मशानभूमी, शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रीकरण, विविध सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, कब्रस्तान संरक्षण भिंत या सर्व कामांसाठी सुमारे 200 कोटींचा निधी मंजूर असून जलद गतीने कामांना सुरुवात असून अनेक कामे पूर्ण ही झालेली आहे. नशिराबादच्या आसपासच्या भादली, बेळी, निमगाव परिसरातील शेतकऱ्यांना बांधावर बंदिस्त पाईपलाईन द्वारे थेट पाणी पोहोचविण्याचे कामही पूर्ण झाले असून या सर्व विकास कामांमुळे नशिराबादचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलत आहे. भविष्यातही नशिराबादचा कायापालट करण्यासाठी आपण जोमाने काम करणार असल्याचे सांगितले.
सुरुवातील काढण्यात आलेल्या भव्य रॅलीला नागरिकांनी जल्लोषात स्वागत करून प्रचंड प्रतिसाद दिला.
सभेला रॉ.का. चे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी देवकर यांच्यावर जोरदार हल्ला – बोल करत त्यांचे अनेक उणे – दुने काढले. सेनेचे संजय पवार, मुकुंदराव नन्नवरे, भाजपाचे संजय महाजन, सुभाषअण्णा, लालचंद पाटील, असलम सर, विकास पाटील यांच्यासह अनेकांनी गुलाबराव पाटील यांच्या धनुष्यबाणाला निवडून देण्याचे आवाहन करीत जोरदार मनोगत व्यक्त केली.
सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले तर आभार शहर प्रमुख विकास धनगर व बापू बोढरे यांनी मांनले. व्यासपीठावर रॉ.का.चे जिल्हाध्यक्ष तथा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी महापौर ललितभाऊ कोल्हे, सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, रिपाईचे अनिल अडकमोल, भरत मोरे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिताताई – कोल्हे माळी, माजी जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, कमलाकर रोटे, भाजपचे चंद्रशेखर अत्तरदे, पियुष कोल्हे, विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर, बापू बोढरे, शिवराज पाटील, हर्षल चौधरी, मिलिंद चौधरी, चंदू भोळे करीम कल्ले, असलम सर, कैलास नेरकर, चेतन बऱ्हाटे, कीर्तीकांत चौबे, किरण पाटील, अनिल भोळे , रवी कापडणे, मिलिंद चौधरी, चंदू पाटील, गोपाळ भंगाळे , जनाआप्पा कोळी, राजू पाटील, जनार्दन माळी, रमेश आप्पा पाटील, सामाजिक अध्यक्ष प्रकाश महाजन, ह. भ .प. सुनील महाराज, दिनेश जैन, एकनाथ नाथ, प्रकाश खाचणे, फकीरा कोळी, सुदाम धोबी, प्रदीप साळी, जितेंद्र महाजन निळकंठ रोटे, सचिन महाजन, राहुल भोई, डी. डी. माळी, मिठाराम म्हस्कर, धनंजय वाणी, संदीप माळी, दीपक सोनवणे, राजू सोनवणे, ज्योतीताई शिवदे, मनोरमा पाटील, शोभाबाई चौधरी, सुनिल शास्त्री, योगेश पाटील, शेख सत्तार, शेख मजीद यांच्यासह परिसरातील सरपंच व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.