<
धनुष्यबाणाच्या जयघोषात आसोदा दणाणले !
टाळ मृदंगाचा गजर आणि वासुदेवांनी केली धमाल
आसोदा/जळगाव – (प्रतिनिधी) – आसोदा आणि परिसरात शिवसेनेचे लोकप्रिय नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारसभेने विकासाचा जयघोष केला. “रस्ते फुल, गावांतर्गत सर्वांगीण विकास, शेत रस्ते, सिंचन बंधारे, ज्येष्ठ नागरिक सभागृह आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी स्मारक” अशा विकासकामांची यशस्वी पूर्तता झाल्याने आसोदा व परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. आसोदेकरांनी कधीही जाती-पातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाच्या बाजूने भक्कमपणे उभे राहण्याचा आदर्श कायम ठेवला असल्याचे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना सांगितले.
वासुदेवांच्या गीतांनी उधळला प्रचाराचा रंग
“वासुदेव आला रे, वासुदेव आला! गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !” या वासुदेवांच्या खास गीतांनी संपूर्ण असोदा परिसर दुमदुमून गेला. हातात चिपळ्या, गळ्यात गजरा, आणि ओठावर गुलाबभाऊंच्या कार्याचा जयघोष करणाऱ्या गीतांनी प्रचारात रंगत आणली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि वासुदेवांच्या उत्साही सादरीकरणाने नागरिक मंत्रमुग्ध झाले.
घरोघरी आरत्या, बहिणींचे औक्षण आणि आशीर्वाद
प्रचाराच्या दरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. सुमारे 500 हून अधिक महिलांनी गुलाबभाऊंचे औक्षण करून त्यांच्या विजयासाठी आशीर्वाद दिले. लाडक्या बहिणींचा एकच भाऊ – गुलाब भाऊ या घोषणा लक्षवेधी ठरल्या “गुलाबभाऊ म्हणजे आसोदेकरांचा लाडका भाऊ!” या भावना महिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.
धनुष्यबाणाच्या रॅलीत मान्यवरांचा सहभाग
शिवसेनेच्या प्रचार रॅलीत माजी महापौर ललित कोल्हे, जनाआप्पा कोळी, बापू महाजन, विनायक ढाके, गिरीश भोळे, तुषार महाजन, महेश भोळे, जीवन सोनवणे, सूर्यकांत चौधरी, अजय महाजन, सुभाष माळी, किशोर चौधरी, दिनकर भील, मधुकर कुंभार, चंदन बिऱ्हाडे, बाळकृष्ण पाटील, सचिन चौधरी, संजय बिराडे, संजय कोळी, भजनी मंडळाचे गोपाळ भोळे, श्रीराम संस्थेचे सुदाम चौधरी, असलमभाई, उमेश बाविस्कर, अनिल कोळी, गजू सावदेकर, पिंटू नारखेडे यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
आसोदेकरांचा ठाम निर्धार
धनुष्यबाणाच्या प्रतिकाने विकासाची परंपरा सुरू ठेवण्याचा निर्धार आसोदे करांनी व्यक्त केला. शिवसेनेचा प्रचार जसा जल्लोषात पार पडला, तसाच या भागातील प्रत्येक व्यक्तीने गुलाबभाऊंच्या विजयासाठी अंग झोकून काम करण्याचा संकल्प केला आहे.