<
जळगाव – (प्रतिनिधी) – येथील नामांकित ओम साई रिअल इस्टेट कॅन्सलटन्टचे संचालक रमेश कुमार मुणोत यांनी आपल्या सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
समाजातील महत्त्वाच्या घटकांपैकी उद्योजक वर्गाचा मतदार म्हणून जबाबदार सहभाग लोकशाही बळकट करण्यासाठी प्रेरणादायी ठरतो. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.