<
जळगांव(धर्मेश पालवे):- भाजपाचे एकनाथ राव खडसे हे भारताच्या भारतीय जनता पक्षाचे राजकारणी, महाराष्ट्र विधानसभा चे विद्यमान आमदार,व महाराष्ट्र राज्य सरकार मधील माजी महसूल मंत्री आहेत. त्याच बरोबर एकनाथ राव खडसे महाराष्ट्रातील भाजपा चे वरिष्ठ व जेष्ठ नेते मानले जातात. खडसे हे १९९० पासून विधानसभेवर निवडून जात आहेत, साल १९९५ ते ९९ ला खडसे हे शिवसेना – भाजपा राज्य सरकार मध्ये अर्थमंत्री व पाटबांधारे मंत्री राहिले आहेत. सध्याच्या महाराष्ट्र मधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार मध्ये खडसे हे महसूल, मस्त्यपालन, पशुसवर्धन, आणि दुग्धविकास मंत्री होते. ४ जून २०१६ रोजी यांना भ्रष्टाचाराच्या बिनबुडाच्या आरोपावरून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास याच भाजप सरकारने भाग पाडले. तर भोसरी प्रकरणी त्यांना दोषी ठरवत बाकी सर्व आरोपावरून क्लीन चिट ही याच भाजप सरकारने दिली. आता येत्या विधानसभा निवडणुकीत गेल्या आरोपावर झाकण टाकून जनकौल घेण्यासाठी मा.एकनाथराव खडसे यांनी १ ऑक्टोबर ला मुक्ताईनगर येथे आपल्या समर्थकांना सूचना देत भेटी प्रसंगी वाजत गाजत निवडणुकी साठी तालुका तहसील मध्ये अर्ज दाखल केला आहे. भाजपा सरकारने विधानसभा निवडणुकीच्या निवडून दिलेल्या निवडक पहिल्या यादीत एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याची वार्ता पर्वापासून पासून जोर धरत आहे, सर्वत्र या बाबत उलट सुलट चर्चा होत आहे. तर काही ठिकाणाहून सर्व लेवा समाज हा एकनाथराव खडसेंना उमेदवारीची संधी न दिल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यासाठी सज्ज झाला आहे, व इतर समाजाकडूनही यावर पाठींबा असल्याचं बोललं जातं आहे. यावरून जेष्ठ भाजप नेत्यावर कमालीची भीती आहे, भाजपात जरी एकमताने सत्ता जळगावात नांदत असली तरी मात्र एका घरात दोन टोक असणारी नेते असल्याने येथील भाजपा मध्ये राजकरण जरा अनोख्या पद्धतीने व हेवे-दावे या उद्देशाने होत असक्याची टीका आहे. शहरी व ग्रामीण भागात एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांची संख्या जास्त आहे, हजरजबाबी, नेहमी धावून जाणे, कार्यकर्ते बांधणीची कसब, दांडगा जनसंपर्क, व गेल्या तीस वर्षा चा प्रदीर्घ राजकीय अनुभव हा खडसे यांच्या राजकीय प्रभावातिल एक भाग आहे, जर या निवडणुकीत त्यांना सरकारने डावलले तर स्थनिक राजकारण, राज्यातील राजकारण, व भारतील राजकारणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल, आणि मग मात्र खडसे यांच्या रुद्र अवतारास इथल्या राजकारणी लोकांना कायमस्वरूपी शिकवण स्वरूपात अनुभव दुखत्या तोंडाने घ्यावा लागेल हे निश्चित.