<
जळगाव-(प्रतिनिधी)- रावेर विधानसभेचा निकाल जाहीर झाला असून भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांचा याठिकाणी विजय झाला असून जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी यांचा पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मोठा फटका बसला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवली. त्यामुळे महायुतीला मतदारांनी मोठ्या प्रमाणात साथ दिल्याचं चित्र आहे. दरम्यान, महायुतीच्या बाजूने कल हाती आल्यानंतर महायुतीचे नेते सेलीब्रेशन करताना दिसत आहेत.
विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेलं यश अतियश महत्त्वपूर्ण आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं चित्र होतं. मात्र, शिवसेनेने वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहावे लागले होते. त्यानंतर अडीच वर्षांनी महायुतीचे सरकार आले, मात्र महायुतीने मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रिपद जाण्याची शक्यत आहे.