<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील सायकलिस्ट जळगाव तर्फे आयोजित सायकलिंग फ्रायडे हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री अंकित साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव सायकलिस्ट ग्रुप तर्फे जळगाव शहरातील वेगवेगळ्या कार्यालयात, व्यवसायात कार्यरत असलेले कर्मचारी हे नित्यनियमाने 30 कि.मी., 50 कि.मी. सायकलिंग करीत असतात. दररोज सायकलिंग करीत असताना सायकलिंग चे महत्व लोकांना पटवण्यासाठी , स्वतःचे आरोग्य व पर्यावरण संतुलित राखण्यासाठी लोकांना सायकलिंग करणे आवश्यक असल्याबाबत जागृती करणे आवश्यक आहे याची संकल्पना सायकलिंग ग्रुपच्या मनात पूर्वीपासून होती.
ही संकल्पना राबविण्यासाठी प्रत्येक कार्यालयात ,व्यवसायात कार्यरत असलेले अधिकारी ,कर्मचारी यांनी प्रत्येक शुक्रवारी सायकलने आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी ,व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन पर्यावरणाचे महत्त्व पटवून देण्याचे ठरवले, त्यानुसार आम्ही जळगाव सायकलिस्ट ग्रुपचे सर्व सदस्य यांनी आज शुक्रवारपासून आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी व व्यवसायाच्या ठिकाणी सायकलिंग सायकलने जाऊन आरोग्याचे व पर्यावरणात संतुलित राखणे बाबत जागृती केली. मा श्री अंकित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सायकलिंग फ्रायडे हा उपक्रम दर शुक्रवारी राबवणे बाबत जिल्हा परिषद अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.
या संकल्पनेनुसार मा. श्री मोहन गाडे धर्मदाय उपआयुक्त, निलेश चौधरी, राम घोरपडे, सखाराम ठाकरे, राजू सोनवणे, राजेश चव्हाण, महेंद्र पाटील, अमोल तडवी, गजेंद्र पाटील तसेच श्री जितेंद्र पवार कार्यालय अधीक्षक पंचायत समिती पारोळा व जिल्हा नियोजन कार्यालयातील परिचर कर्मचारी श्री उमाकांत पाटील यांनी आपापल्या कार्यालयामध्ये सायकलने प्रवास करून या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.