Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज भरण्यासाठीची मुदत १ डिसेंबर पर्यंतच

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज भरण्यासाठीची मुदत १ डिसेंबर पर्यंतच

कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा पोष्टाने अर्ज सादर करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव – ( जिमाका )- वाघुर धरण विभाग जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा या प्रकल्पावर शक्य असेल तेथे कालव्याद्वारे (प्रवाही) तसेच अधिसुचीत / अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाला व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणा-या सर्व बागायतदारांनी चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध झालेल्या पाणी साठ्यानुसार रब्बी हंगाममध्ये 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठ्यातुन पाणी पुरवठा करणार असल्याचे वाघुर धरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता प्र.अ. महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे कळविळे आहे.

उन्हखरीप हंगाम सन 2024-25 अखेर शेतकऱ्यांना संपूर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहणार आहे, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाचा निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रांमपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जावर नियमानुसार जास्त पाणीपट्टी आकारणी केली जाईल. मंजुर क्षेत्रसच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागणार आहे. पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागणार आहे. तसेच पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येणार आहे.
या सर्व अटींच्या पूर्ततेसह नमुना नं. 7 पाणी अर्जावर मागणी करून पाणी अर्ज 1 डिसेंबर 2024 च्याआंत संबंधित वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष जमा कराण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

तसेच उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करून अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे ठोक जलप्रशुल्क निर्धारण आदेश दि. 29 मार्च 2022 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे प्रत्रकात म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रतापराव पाटील यांच्या विविध गावांमध्ये द्वारदर्शनपर भेटी ; निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पुन्हा लोकसेवेत सक्रिय

Next Post

गोंदिया जिल्ह्यातील शिवशाही बस अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo