चाळीसगाव – (प्रतिनिधी) – राज्यातील नुकताच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीची धामधुम आता संपली असून राज्याला प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळाची. मात्र निवडणुकीतील यशा अपयशाची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
राज्यातील सर्वच मतदार संघातील मतदानाची आकडेवारी आता उघड झाली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झालेल्या मंगेश चव्हाण यांचा नावावर नवीन विक्रम झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्वात तरुण आमदार मंगेश चव्हाण असून तरुण कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना पैकी सर्वाधिक मते त्यांनी घेतली आहेत. 157101 इतके सर्वाधिक मते घेणारे ते जिल्ह्यात नंबर १ ठरले आहेत. तसेच राज्यात सर्वाधिक मते घेणाऱ्या 288 पैकी 25 आमदारांमध्ये देखील त्यांनी आपला 24 वा नंबर पटकावला आहे. राज्यात दीड लाखांहून मते घेणारे जवळपास 32 आमदार आहेत. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश आहे. त्यामध्ये घुळे रघुवेंद्र पाटील-170398 ,बागलाण दिलीप बोरसे-159681, मालेगाव दादाजी भुसे158284, चाळीसगाव मंगेश चव्हाण157101, नाशिक राहुल ढिकले-156846, नंदुरबार विजयकुमार गावित-155190, जळगाव सुरेश भोळे-151536, शिंदखेडा जयकुमार रावल-151492 यांचा समावेश आहे. राज्यात सर्वाधिक मते चिंचवड येथील शंकर जगताप-235323 यांना मिळाली आहेत.
चाळीसगाव मतदारसंघात गेल्या अडीच वर्षातील भरीव विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मतदान केल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. पुणे, मुंबई ,नागपूर सारख्या शहरातील मोठ्या मतदार संघाच्या तुलनेने ग्रामीण भागातून आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्वाधिक मते घेऊन राज्यातील टॉप 25 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे हे विशेष होय.