जळगांव – महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी यादेशातील समस्त भारतीयांना न्याय दिला आहे. आज देशातील लोकसंख्येच्या तुलनेने 50 ℅ महिला वर्ग आहे. या सर्वांना महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करून आपले हक्क – अधिकार दिले आहे. प्रगतीच्या शिखराची दारे खुली करून दिले आहे. महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी विशिष्ट जाती – धर्म साठी कार्य केले नाही. तर कुठलाही भेद मनात न ठेवता अखंड भारतासाठी महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले आहे. महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली तत्व – विचार – कार्य चा सर्व स्तरावर प्रचार करण्यासाठी महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीसाठी नव्हे तर 6500 जातीसाठी कार्य केले आहे. त्यांना न्याय दिला आहे. यासाठी प्रचारक असणे फार आवश्यक आहे. महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगतात. तुमचे विचार – तत्व कितीही महान असू द्या. परंतु त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रचारक नसेल तर….ते तत्व – विचार आपण गेल्यावर संपून जातात. यासाठी संघटना असणे आवश्यक आहे. आणि त्याच बरोबर प्रचारक आणि आज खरी गरज आहे. प्रचारक यांची यासाठी सर्वांनी महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना 68 व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करून समता सैनिक दलात सहभागी होऊन प्रचारक ची जवाबदारी स्विकारुन महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक – राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी कटिबद्ध व्हा. असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांनी जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल जवळ तथागत गौतम बुद्ध व महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात केले.
जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोड ,रेड क्रॉस सोसायटी समोरील तथागत गौतम बुद्ध – महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,याठिकाणी महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समता सैनिक दलाचे राज्य संघटक विजय निकम यांची होती.
विजय निकम यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माल्यार्पण करण्यात आली. त्यांनंतर सामूहिक बुद्ध वंदना घेवून तथागत गौतम बुद्ध व महामानव. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राज्य संघटक विजय निकम यांनी उपस्थित समाज बांधव यांना मार्गदर्शन केले. यावेळी समता सैनिक दलाचे प्रचारक गौतम सोनवणे ,रवींद्र सोनवणे, सुधाकर बाविस्कर, संतोष सपकाळे, भाईदास पाटील ,बौद्ध वसाहत सेवा संघ चे भिका भालेराव ,राजू सपकाळे, आनंद सोनवणे,गौतम अप्पा साळवे, अशोक भालेराव, अशोक सोनवणे,पवन चॅरिटेबल ट्रस्ट चेडॉ. विलास नारखेडे, जगदीश नेहते ,डॉ. हरीश सोनार ,सुधाकर सपके ,रघुनाथ राणे , राजेश वाणी,गुरुजी सचिन भोळे , ऍड. सलीम शेख कार्यक्रम यशस्वी साठी सुखदेव सपकाळे, ध्यानेश्वर महाले, शंकर सपकाळे यांनी परिश्रम घेतले. आभार विलास नारखेडे यांनी मानले.