कसारा – (प्रतिनिधी) – येथे ज्ञानाचा अथांग सागर, जागतिक महाविद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त कसारा येथे विविध ठिकाणी आदरांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील खाजगी वाहनतळा शेजारील रेल्वेच्या पटांगणात रिपाइं आंबेडकर नगर शाखेच्या वतीने ठाणे ग्रामीण पोलिस, आर पी एफ अधिकारी आणि कर्मचारी त्याच प्रमाणे कसारा गावातील निमंत्रित प्रतिष्ठित व्यक्तीं व धम्म उपासक उपासिकांच्या उपस्थितीत सालाबादप्रमाणे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मनीषा हिवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेप्रसंगी बौद्धाचार्य परशुराम पंडित यांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील अर्थात संस्कारविधी वदवून घेतला, तर ठाणे क्राईम ब्रँच पो निरिक्षक संदीप गीते, स्थानिक उपसरपंच शरद वेखंडे, राहुल शेजवळ, हिवरे मैडम, रिपाई अध्यक्ष व सचिव अनुक्रमे किरण सोनवणे, सुनील पवार आदी निवडक वक्त्यांनी मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अतुलनीय त्यागाची महती सांगून त्यांच्या पावन स्मृतिस आदरांजली वाहिली. तर या अभिवादन सभेस आर पी एफ उपनिरीक्षक वाहूळकर, ए एस आय सांगळे, काँ रविंद्र गोसावी, ग्रामीणचे पी आय सुनील बच्छाव, श्री निकम व इतर पो कर्मचारी, रिपाइंचे जिल्हा नेते सुहास जगताप, अशोक हंडोरे, राजेंद्र उबाळे, संतोष कर्डक, राजेंद्र पंडित, सरपंच प्रकाश वीर, नगरसेवक अनुक्रमे सरपंच प्रकाश वीर, नगरसेवक अनुक्रमे रविंद्र उबाळे, नारायण पेढेकर, गौरव उबाळे, पोलिस पाटील अशोक कर्डक, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र सोनवणे, दिनेश हंडोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेनंतर चैत्यभूमीकडे रवाना होणाऱ्या व परतणाऱ्या प्रवाशांकरिता रिपाइंमार्फत मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याच प्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर फेरीवाला संघटनेच्या वतीनेही प्रवाशांना रुचकर भेलभत्ता तर रेल्वे कर्मचा-यांच्या वतीने अल्पोपहार अगदी मोफत वितरित करण्यात आला. शिवाय येथील कसारा विभाग एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन रविंद्र शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली अग्रवाल हायस्कुलमध्ये देखील बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली.