<
जळगाव दि. 10( जिमाका ) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, यांच्या कार्याचे, योगादानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा, प्रोत्साहन मिळावे व क्रीडा क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी. या उद्देशाने त्यांना जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. यंदाही जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार – एक, पुरस्कार वर्ष – २०२४-२५ पुरस्कारासाठी दि. १ जुलै, २०१3 ते दि. ३० जुन, २०२3 व दि. १ जुलै २०२४-२५ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे. गुणवंत खेळाडू पुरस्कार – तीन जणांना दिला जाणार आहे. यात महिला, पुरुष व दिव्यांग खेळाडूंचा सामावेश असणार आहे. ज्यात दि. १ जुलै, २०१८ते दि. ३० जून, २०२३ या कालावधीतील कामगीरी ग्राह्य धरली जाणार आहे.
या व्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंना शासन निर्णयानुसार थेटचे पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२४-२५ वर्षसाठी अर्ज भरण्याचा कालावधी ११ ते ३०डिसेंबर, २०२४ पर्यंत आहे. अर्जदाराने अर्ज व आवश्यक कादगपत्रे बंद लिफाफ्यामध्ये ३० डिसेंबरपर्यंत कार्यालयात सादर करणे आवश्यक असणार आहे. अर्जाबाबत अधिक व माहिती करीता श्री. सुरेश थरकुडे, मो.क्र. 9823773797 या क्रमांकावर संपर्क साधावा.
विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याकरीता व पुरस्काराच्या अटी व शर्ती इतर माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, तसेच विहित मुदतीत प्रस्ताव अर्जदाराने या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.