जळगाव – (प्रतिनिधी) – येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगांव राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने १ डिसेंबर ते ७ डिसेंबर एड्स सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी एड्स जाणीव जागृती व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.
या प्रसंगी व्यासपीठावर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण पथकात कार्यरत श्री प्रशांत पाटील , निशिगंधा बागुल एस.टी.आय समुपदेशक, दिपाली पाटील एड्स समुपदेशक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, राष्ट्रीय योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ.भारती गायकवाड,
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.अशोक हनवते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास वक्ते म्हणून श्री.प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना एच आय व्ही आणि एड्स यातील फरक सांगून जिल्ह्यातील आजची एड्स रोगाच्या प्रादुर्भावाची स्थिती सांगून विद्यार्थ्यांनां प्रश्न उत्तरातून विस्तृत माहिती सांगितली.
सौ. निशिगंधा बागुल यांनी एड्स प्रादुर्भावाची कारणे एड्स आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी तसेच नियमित चाचणी द्वारे एड्स आजार प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
सौ. दिपाली पाटील यांनी एड्स ग्रस्तांना किंवा प्रत्यक्षात त्यांच्या विभागात आलेल्या व्यक्तींचे समुपदेशन कसे केले जाते या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर रेड रिबीन क्लब ची स्थापना करून त्या अंतर्गत महाविद्यालयातील तरुणांना या आजारा विषयी विस्तृत संपूर्ण माहिती मिळते जेणेकरून भविष्यात या आजाराच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना ही महत्वपूर्ण ठरते.
एडस सप्ताह निमित्त महाविद्यालयात राष्ट्रीय स्वयंसेवकांनी पोस्टर बनवलेले होते आणि निबंध स्पर्धा देखील घेण्यात आलेली होती.
सदर स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय विजेते स्वयंसेवकांना मान्यवरांच्या हस्ते व कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. नितीन बडगुजर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन साहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. दिपक प्रकाश महाजन यांनी केले. कार्यक्रमाला ९८ स्वयंसेवक उपस्थित होते उपस्थित स्वयंसेवकांना व मान्यवरांना चहा नाश्ता देवुन कार्यक्रमाचा समारोप केला.