जळगाव – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या एएनएम (ऑक्सिलरी नर्सिंग मिडवायफरी) द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी २०२३-२४या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांनी १००% निकालाची परंपरा राखत महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची उंची कायम ठेवली आहे.
यात प्रथम क्रमांक सपकाळे दिव्या ८०.१६%, द्वितीय क्रमांक जीवतोळे विना ७८.३३%, तृतीय क्रमांक हुसले अंजली ७७.८३%, चतुर्थ क्रमांक बाविस्कर प्रतिभा ७७.६६%पाचवा क्रमांक सिक्कल्गर मिसबहुळुन संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. प्राचार्य विशाखा गणवीर, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे व सर्व शिक्षक वृंद यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयाच्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना केवळ यश मिळत नाही, तर व्यावसायिक जगासाठी ते सक्षम होतात.