जळगाव, दि. 18 (जिमाका)- जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ या विषयाच्या अनुषंगाने “अंतर्गत तक्रार समिती” गठीत करण्यांत आलेली आहे. या समितीमार्फत “महिला लैंगिक छळ विरोधी कायदा” आणि “कायदयाच्या अनुशंगाने कार्यालयीन वर्तवणूक व व्यवस्थापन” या दोन विषयावर मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अॅड. मंजुळा मुंदडा आणि श्रीमती सुचित्रा महाजन यांनी कार्यालयातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना या विषयावर मार्गदर्शन केले. अँड. मुंदडा यांनी कार्यालयातील उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महिला लैंगिक छळ विरोधी कायदयाबाबत मार्गदर्शन करुन कायदयाची जाणीव करुन दिली. तसेच कायदयाच्या तरतूदी व कार्यपध्दतीबाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्रीमती महाजन यांनी कायदयाचे अनुषंगाने कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात कार्यरत असतांना आपली वर्तवणूक/शिस्त कशी असावी, कार्यालयीन वातावरण चांगले कसे राहील आणि त्यासाठी कशा पध्दतीने नियोजन/व्यवस्थापन ठेवावे याबाबत सोप्या भाषेत माहिती दिली.