Saturday, March 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा;गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने परिमंडळ – २ चे उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांची माहिती 

शाडूची मूर्ती बनविणाऱया मूर्तीकारांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन जास्तीत-जास्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in राज्य
Reading Time: 1 min read
सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा;गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने परिमंडळ – २ चे उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांची माहिती 

मुंबई-(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री. गणेशोत्सव मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून  मूर्तीकारांना दरवर्षी मोफत शाडू माती, मंडप उभारण्याकरिता जागा यासह  विविध सोयी-सुविधा पुरविल्या जातात. सन २०२५ मध्ये नियोजित गणेशोत्सवास दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेकडून नागरी सेवा-सविधा पुरविल्या जातील. गणेशोत्सव पर्यावरणपूरक रीतीने साजरा करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.

‘गणेशोत्सव २०२५’ च्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तीकार संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात काल (दिनांक १९ डिसेंबर २०२४) ‘एफ दक्षिण विभाग’ कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा बृहन्मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे हे बोलत होते.

या बैठकीला जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्री. मनीष वळंजू, एन विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे आदी उपस्थित होते. तसेच, मुंबई उपनगर श्रीगणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव श्री. विनोद घोसाळकर, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सचिव श्री. सुधीर साळवी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. नरेश दहिबावकर, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे म्हणाले की, सन २०२४ चा गणेशोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी महानगरपालिका प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी दरवर्षी मूर्तीकारांना शाडूची माती आणि जागा मोफत उपलब्ध करून देण्यात येते. या उपक्रमाला मूर्तीकारांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. त्याच अनुषंगाने सन २०२५ मध्ये देखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती साकारण्यावर भर द्यावा. यासाठी महानगरपालिकेकडून मूर्तीकारांना जास्तीत-जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच त्यांना गतवर्षीप्रमाणे यंदाही शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, बैठकीत मूर्तीकारांच्या सूचनादेखील जाणून घेण्यात आल्या. पदाधिकारी, प्रतिनिधी आणि मूर्तीकारांच्या सूचनांचा महानगरपालिका प्रशासनाकडून सकारात्मक विचार करून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन श्री. सपकाळे यांनी यावेळी दिले.

गतवर्षी महानगरपालिकेने शाडू माती आणि जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मोठी मदत झाल्याचे मूर्तीकारांनी नमूद केले. तसेच कृत्रिम तलावांची निर्मिती करणे, झाडांची सुयोग्य प्रकारे छाटणी करणे आणि रस्त्यांच्या परिरक्षणाची कामे करणे, यासारखी विविध कामे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे गतवर्षी चांगल्याप्रकारे करण्यात आली. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्तरावर साधण्यात येणारा सुसमन्वय हा निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गारदेखील उपस्थित पदाधिकाऱयांनी काढले. त्याचबरोबर, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महानगरपालिकेला सहकार्य केले जाईल, असेदेखील यावेळी पदाधिकाऱयांनी नमूद केले.

यावेळी, उत्सवी आणि पुनरावर्तन या संस्थेच्या प्रतिनिधींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच त्यासंबंधिचे उस्थितांसमोर संगणकीय सादरीकरणही केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तयारीचा घेतला आढावा;अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाची पर्वणी

Next Post

सुशासन सप्ताह “प्रशासन गाव की और” मोहीमेतंर्गत तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे 23 डिसेंबर रोजी आयोजन

Next Post

सुशासन सप्ताह “प्रशासन गाव की और” मोहीमेतंर्गत तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे 23 डिसेंबर रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d