Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/12/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत इतिहासकार अनिल नौरिया यांचे व्याख्यान
जळगाव-(प्रतिनिधी)- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्मधिकारी व्याख्यानमालेंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता व सुप्रसिद्ध इतिहासकार अनिल नौरिया यांचे “असहयोग आंदोलन – स्वतंत्रता संग्राम की अनोखी मशाल” या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यान मालेचे हे चतुर्थ पुष्प आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असहयोग आंदोलनाचे विशेष महत्त्व आहे. २०२४ हे महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखालील असहयोग आंदोलनाचे शताब्दी वर्ष असल्याने असहयोग आंदोलन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन सोमवार, दि. २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या दत्तात्रय धांडे सभागृहात करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे वक्ते मा. अनिल नौरिया गेली ४ दशके नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ विधीज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ते नेहरु स्मृती संग्रहालय व ग्रंथालयाचे वरिष्ठ सहकारी म्हणून कार्यरत होते. एक बहुआयामी अभ्यासू व्यक्तित्व  असलेल्या नौरिया यांनी दिल्ली, डर्बन, बडोदा, टोकियो, जोहान्सबर्ग, ग्वाल्हेर, हैदराबाद यासह विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. त्यांची अनेक पुस्तके व संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले आहेत. अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. गौरी राणे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. अंबिका जैन व कुलसचिव डॉ.  विनोद पाटील यांनी आयोजकांच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

Next Post

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

Next Post
जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  – एस. एस. म्हस्के

जैन हिल्स कृषिमहोत्सवामध्ये मिळतोय हायटेक शेतीचा मूलमंत्र  - एस. एस. म्हस्के

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo