जळगाव- (प्रतिनिधी)- के सी ई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव च्या विद्यार्थिनींच्या संघाने जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पुणे येथील बिबवेवाडी परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात दि.20 ते 22 डिसेंबर दरम्यान अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद संस्था असलेली बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित राज्यस्तरीय पहिल्या बालरंगभूमी संमेलनात जिल्हास्तरावरून निवड होऊन सहभागी होत आपला विशेष ठसा उमटवला.
संमेलनात विद्यार्थ्यांनी शोभा यात्रेमध्ये लेझीम पथकाचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले त्यात सिने अभिनेते विजय गोखले यांनीही संबळच्या तालावर ठेका धरत लेझीम नृत्याचा आनंद घेतला. त्याचप्रमाणे विविध कला दर्शनामध्ये महाराष्ट्रीयन बंजारा नृत्याचे सुंदर असे सादरीकरण मुलींच्या संघाने केले. प्रसंगी विद्यार्थिनींचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेट वस्तूची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशीl, विजय गोखले, सयाजी शिंदे, प्रशांत दामले, अभिनेत्री नीलम शिर्के, डॉ.मोहन आगाशे, सविता मापलेकर, जयमाला इनामदार तसेच मराठी सिनेसृष्टीतील इतर कलाकार उपस्थित होते.
उपशिक्षक योगेश भालेराव यांनी प्रशिक्षित केलेल्या संपूर्ण संघाला बालरंगभूमी परिषदेचे जळगाव शाखा अध्यक्ष जळगाव शाखा अध्यक्ष जळगाव शाखा अध्यक्ष, योगेश शुक्ल प्रमुख कार्यवाहक विनोद ढगे शाळेच्या मुख्या. धनश्री फालक, उपशिक्षक योगेश पाटील, गायत्री पवार , सुधीर वाणी,बाल रंगभूमी परिषदेचे कार्यकारणी सदस्य सचिन महाजन नेहा पवार मोहित पाटील ,अमोल ठाकूर सुदर्शन पाटील, पंकज बारी, दर्शन गुजराती ,रोहन चव्हाण, अवधूत दलाल इत्यादींचे मार्गदर्शन लाभले.