जळगाव — (प्रतिनिधी )-येथील डॉ गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडीकल कॉलेज,हॉस्पीटल अँन्ड रिसर्च सेंटर, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय आयोजित आंतरराष्ट्रीय ध्यान दिवसानिमीत्त विदयार्थ्यांनी ध्यानाच्या योग्य पध्दतीचे धडे घेतले.
सोहम डिपार्टमेंट ऑफ योगा अँन्ड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ देवानंद सोनार यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते. त्यांच्यासोबत आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ. हर्षल बोरोले, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके,प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड, नर्सिंगच्या प्राचार्य विशाखा गणविर,प्रा पियुष वाघ,प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे,आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. साजिया खान, प्रा. डॉ.निखील चौधरी, डॉ कोमल खांडरे, डॉ. मुकेश चौधरी, डॉ. पालवी चौधरी, डॉ. मयुरी चौधरी,प्रशासकिय अधिकारी चेतन चौधरी नितीन पाटील इ उपस्थीत होते. यावेळी प्रात्याक्षिक व्दारे ध्यानाच्या विविध पध्दती डॉ. साजिया, डॉ कोमल खांडरे यांच्या माध्यमातून दाखवत डॉ. देवानंद सोनार यांनी ध्यान ही एक साधी आणि प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यात सुधारणा होते. जागतिक ध्यान दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने या पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे तणावमुक्त आणि सकारात्मक जीवनशैली अनुभवता येईल. ध्यान हा फक्त सराव नाही, तर तो जीवनशैलीतील सकारात्मक बदल घडवणारा प्रवास आहे असे सांगितले.पुढे बोलतांना त्यांनी ध्यान किंवा चिंतन ही प्रभावी पद्धत आहे, जी केवळ मानसिक तणाव कमी करत नाही तर जीवनशैलीत सकारात्मकता आणते. असे सांगितले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार निर्सगा जाधव यांनी केले तर यशस्वीतेसाठी मोहित येवले यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.