जळगाव – (प्रतिनिधी) -कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत जळगाव क्रीडा विभाग आंतरमहाविद्यालयीन हॅन्डबॉल पुरुष व महिला स्पर्धा 2024 चे आयोजन खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय येथे करण्यात आले यामध्ये जळगाव क्रीडा विभागातील एकूण पुरुषांचे पाच व महिलांचे तीन संघांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर अशोक राणे यांनी केले स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव विभागाचे क्रीडा सचिव डॉ.आनंद उपाध्याय होते तसेच डॉ. नवनीत आसी,डॉ.अनिता कोल्हे,प्रा.सुभाष वानखेडे,प्रा.अंजली बनापुरे, प्रा.सागर सोनावणे,प्रा.हिमानी बोरोले,साधू तागड,भरत चौधरी उपस्थित होते. मुलांच्या संघात मु.जे.महाविद्यालयाने प्रथम स्थान पटकावले तर द्वितीय स्थान जी.एच. रायसोनी महाविद्यालयाने पटकवले.तसेच मुलीची निवळ चाचणी घेण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आकाश बिवाल यांनी केले तर आभार विभाग प्रमुख प्रा. प्रवीण कोल्हे यांनी मानले.