जळगाव – (प्रतिनिधी) – पेसा कायद्याच्या निर्मितीला २४ डिसेंबर २०२४ रोजी २८ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने पंचायत राज मंत्रालयाने हा दिवस ‘पेसा दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते. त्यानुसार जळगाव जिल्ह्यासह १३ जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना राज्य पेसा कक्षाच्या वतीने पत्र पाठवून २४ डिसेंबर हा दिवस ‘पेसा दिवस म्हणून साजरा करण्याबाबत १९ डिसेंबर रोजी पत्राद्वारे कळविलेले होते. जळगाव जिल्ह्यातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यात प्रामुख्याने रावेर, यावर व चोपडा तालुक्यातील पेसा गावांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती रावेर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाल,प्रिंपी,निमड्या,लोहारा,कुसुंबे बु,कुसुंबे खु,मोहमांडली,जिन्सी,आभोडा बु,जानोरी,मोहगन,सहस्रलिंग, पाडले बु येथील ग्रामपंचायत व पाड्यांवर पेसा दिन मोठ्या हर्षोल्लास साजरा करण्यात आला.
गटविकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पेसा दिनानिमित्त पाडले बु गावात जि.प.शाळेमार्फत जनजागृती रॅली काढण्यात आली तसेच पेसाची माहीती मार्गदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे व विस्तार अधिकारी प्रविण शिंदे यांच्या हस्ते धरतीआबा भगवान बिरसा मुंडा व क्रांतीकारक ख्वाजा नाईक यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच रूबीना हमीद तडवी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यानंतर उपस्थित जनसमुदायाला पेसा व्यवस्थापक युनुस तडवी यांनी पेसा कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. विस्तार अधिकारी यांनी पेसा कायदा अंमलबजावणी बाबत मार्गदर्शन केले व अध्यक्षीय मनोगत गटविकास अधिकारी के.पी.वानखेडे यांनी केले सुत्रसंचलन व आभार ग्रामपंचायत अधिकारी धनराज सुरसे यांनी केले.
कार्यक्रमास पेसा समन्वयक भुषण राजपूत, उपसरपंच रशिद तडवी, ग्रा.पं. सदस्य अजमत तडवी, मदिना तडवी, गुलशेर तडवी, संगिता तायडे, शोभा महाजन, इरशाद तडवी, डॉ.अमोल पाटील, मुख्याध्यापिका मॅडम, ग्रा.पं. कर्मचारी, पेसा मोबालाझर अकबर तडवी, शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत पाडले बु यांनी परिश्रम घेतले.