जळगाव – के. सी. ई. सोसायटी संचलित ओरियन इंग्लिश मिडीयम स्टेट बोर्ड स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दि.०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महिलांसाठी अतुलनीय कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह सावित्रीबाईंनी ब्रिटिश राजवटीत पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली भारतीय शाळा सुरू केली.
महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळख असलेल्या सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
यात इयत्ता नर्सरीतील विद्यार्थिनी कापडे आराध्या जीवन हिने सावित्रीबाईंविषयी विचार मांडले.
तर धनगर हर्षिता राहुल हिने सावित्रीबाईंची वेशभूषा धारण करत वक्तृत्व सादर केले.
सिनिअर के. जी. (गंगा) या वर्गातील विद्यार्थिनी पाल आर्या लालचंद हिनेदेखील सावित्रीबाईंची वेषभूषा धारण करत सावित्रीबाईंविषयी आपले विचार मांडले.
सिनिअर के. जी. (यमुना) या वर्गातील विद्यार्थिनी प्रजापती कणक सिध्दार्थ हिने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित वक्तृत्व सादर केले.
सुत्रसंचलन सौ. अर्चना पाटील मॅम् यांनी केले.
सदर कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री. श्रीधर सुनकरी सर, उप प्राचार्या श्रीमती रजनी गोजोरेकर मॅम् आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.