जळगाव -(प्केरतिनिधी)- सीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पाडले महाराष्ट्राच्या लोककलेच्या जागर या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांनी केला. सर्वप्रथम कार्यक्रमा चे प्रमुख पाहुणे समारंभाचे अध्यक्ष केसीई सोसायटी चे सन्माननीय सभासद डॉ. हर्षवर्धन जावळे ,रुपेश चिरमाडे , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी जि.प. जळगाव नरेंद्र चौधरी , डॉ. अंकश्री बेंडाळे , के. सी.ई.सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर , मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे , अर्चना नेमाडे , शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले.
त्यानंतर इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आपला जळगाव जिल्हा’ या विषयावर आधारित हस्तलिखिताचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी आदर्श विद्यार्थी म्हणून कौस्तुभ जयवंत खैरनार , आदर्श विद्यार्थिनी म्हणून अनुश्री अनिल चौधरी तर गुणवंत विद्यार्थी म्हणून यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
महाराष्ट्रातील विविध कलाकृतींवर आधारित लोकनृत्य यावेळी सादर करण्यात आले त्यात गोंधळ ,पोतराज ,लावणी वाघ्या मुरळी, वासुदेव ,डोंबारी, कोळीगीत अशा गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्रीफालक यांनी केले ,सूत्रसंचालन उपशिक्षिका कल्पना तायडे, भावना पाटील, सीमा गोडसे तसेच गायत्री पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन उपशिक्षक योगेश भालेराव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.