<
पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उदंड प्रतिसा
पुणे – रसिक, कलाप्रेमी, सौंदर्यप्रेमी, चोखंदळ अशी अनेक बिरुदं मिरवणाऱ्या पुण्यात रतनलाल सी. बाफना नव्या शोरुमचा काल भव्य शुभारंभ नळ स्टॉप, कर्वे रोड येथे संपन्न झाला. आभूषणांचे स्वर्णतीर्थ मानल्या जाणाऱ्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सला पहिल्याच दिवशी पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. दिवसभर अलंकारप्रेमी ग्राहकांची येथे वर्दळ पहायला मिळाली. सणासुदीचे दिवस पाहता ३ ते ९ ऑक्टोबर स्वर्णतीर्थात शुभारंभ सप्ताहांचे आयोजन करण्यात आले आहे.
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या शुभारंभ सोहळ्यास सकाळी १०. ३० वाजता सुरुवात झाली. यावेळी स्वर्णतीर्थाचे संचालक रतनलाल सी. बाफना यांनी समस्त पुणेकरांचे आभार मानत स्वर्णतीर्थाची विश्वसाची व पारदर्शकतेची परंपरा कायम राहील असे वचन दिले. पुणेकरांना स्वर्णतीर्थाच्या अद्भुत, अनुपम अश्या विविध अलंकारांच्या स्वर्ण खरेदीचा लाभ आता घेता येणार आहे. जळगाव येथून छोट्याश्या स्वर्ण पेढीपासून सुरु झालेला स्वर्णतीर्थाचा प्रवास आज पुणे येथील शुभारंभाच्या निमित्ताने सातव्या भव्य दिव्य अश्या शाखांपर्यंत दिमाखदारपणे पोहचला. आता स्वर्णतीर्थ प्रत्यक्षात पुण्यात आल्याने पुणे तसेच जवळपासच्या अन्य शहरांसाठी देखील अस्सल, अनोखी, उच्च्य दर्जाची स्वर्ण खरेदी करणे सोयीचे होणार आहे. जळगाव येथे ग्राहकांच्या सोयीसाठी स्वर्णतीर्थाचे तीनभव्य शोरूम ग्राहकांच्या सेवेत आहेत. जळगाव सोबतच औरंगाबाद, नाशिक, नांदेड या शहरांमध्येही स्वर्णतीर्थाने अल्पावधीतच विश्वास संपादन करून विविधता आणि माफकता देऊन असंख्य सुवर्णप्रेमी ग्राहकांची मने जिंकली आहेत. स्वर्णतीर्थाचे समाधानी ग्राहक केवळ जळगाव किंवा महाराष्ट्रा पुरते मर्यादित न राहता संपूर्ण भारतभरात आहेत. ग्राहकांच्या आनंदाच्या क्षणांना अविस्मरणीय करण्यासाठी, नाती समृद्ध करण्यासाठी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स गेल्या ४५ वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास जपत सचोटीने कार्यरत आहे.
‘पुणे तेथे काय उणे’ अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. या म्हणीला सार्थ ठरवत सर्व प्रकारच्या अद्यावत सेवेसह आता रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने आता पुण्यात आपल्या सेवेचा श्रीगणेशा केला आहे. अन्य शाखांप्रमाणेच पुणे शाखा देखील अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण, सुविधासंपन्न आहे. पारंपरिकता व आधुनिकतेच्या अनोख्या संगमाची परंपरा पुण्यात देखील अखंडपणे पहायला मिळेल अशी अपेक्षा शुभारंभ सोहळ्याला उपस्थित ग्राहकांकडून ऐकायला मिळाल्या. पुणे शहर हे स्वतःमध्ये एक भारत आहे. येथे भारतभरातून, भारताच्या विविध शहरांमधून लोक शिक्षण, नोकरी, व्यापारासाठी येतात. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृतींना त्यांच्या आवडीचे, समाजाचे दागिने देण्याचा संकल्प स्वर्णतीर्थाने केला आहे.
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सची तिसरी पिढी आता नव्या उत्साहाने नव्या कल्पना, संकल्पना घेऊन पुण्यातील अलंकार प्रेमींच्या सेवेत सज्ज झाली आहे. स्वर्ण पेढीच्या व्यवसायात सोन्यापेक्षाही महत्वाची असते त्या व्यवसायातील शुद्धता, विश्वास, नाविन्यता आणि विविधता. आणि या सर्व कसोटींवर रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स गेल्या ४५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून खरे उतरलेले आहेत. म्हणून तर केवळ खान्देशच नाही तर देशभरातून स्वर्ण खरेदीसाठी आलेले सन्माननीय ग्राहकस्वर्णतीर्थ परिवाराचाच एक घटक झालेले आहेत. स्वर्णतीर्थ महाराष्ट्रातील जुन्या, विश्वसनीय आणि अग्रगण्य स्वर्णपेढीं पैकी एक आहे. व्यवसायाला सामाजिक जाणीवेची जोड देऊन स्वर्ण व्यवसाय करण्याला स्वर्णतीर्थ नेहमीच प्राधान्य देत आलेय.
पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच नळ स्टॉप, कर्वे रोडवर स्वर्णतीर्थाचं हे भव्य शोरूम एकप्रकारे सुंदर पुण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालणार आहे. स्वर्णतीर्थाचा ३ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान भव्य शुभारंभ शुभारंभ सप्ताह सुरु राहणार आहे. तरी पुणेकरांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स तर्फे कळविण्यात आले आहे.