जळगाव-(प्रतिनिधी)- के सी ई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शाळेची इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आराध्या पाटील हिने सावित्रीबाईंची भूमिका साकारून त्यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. शाळेच्या उपशिक्षिका मंगल गोठवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.