जळगाव – (प्रतिनिधी) – जळगाव येथील श्रोत्यांच्या पसंतीच्या बालगंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिंपा शिवा यांच्या एकल तबलावादनाने आणि नंदिनी शंकर व महेश राघवन यांच्या व्हायोलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला. स्व वसंतराव चांदेकर स्मृती प्रतिष्ठानच्या या बालगंधर्व महोत्सवाचे २३ वे वर्षे होते २०२७ मध्ये या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष असेल.
महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमा आधी वरुण नेवे यांनी गुरुवंदना सादर केली. सूत्रसंचालक जुई भागवत हिने रिंपा शिवा हिचा परिचय करून दिला. रिंपा शिवाचा तबला सोलो झाला. आपल्या प्रस्तुतीत तीन ताल प्रस्तुत केला. यामध्ये पेशकार, कायदा, रेला, तुकडा चक्रदार इत्यादी प्रस्तुती त्यांनी केली. त्यांना संवादिनीची साथ अथर्व कुलकर्णी यांची होती.
दुसऱ्या सत्रात नंदिनी शंकर यांचे व्हायोलिन वादन व महेश राघवन यांचे जिओ श्रेड अशी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व कर्नाटक संगीत यांची जुगलबंदी रंगली. फ्युजन देखिल सादर झाले. ‘आज जाने की जीवना करो’ जयजयवंती रागातील तराना, ठुमरी व उपज सादर केले. त्याला श्रोत्यांकडून दाद मिळाली.
सोलो वादक रिंपा शिवा, व्हायोलीन वादक नंदिनी शंकर, श्रेड वादक महेश राघवन या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात कलाकारांचे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. चांदोरकर प्रतिष्ठानचे कार्यकारी संचालक दीपक चांदोरकर यांनी ऋण व्यक्त केले. २४ वा बालगंधर्व महोत्सव ८, ९ आणि १० जानेवारी २०२६ ला सादर होणार असल्याचे सांगितले.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्यावतीने व जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स, गोदावरी फाउंडेशन, जळगाव जनता सहकारी बँक, जाई काजळ, वेगा केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड, संस्कृती मंत्रालय भारत सरकार, यांचे प्रायोजकत्व लाभलेल्या या महोत्सवास चांदोरकर टेक्नॉलॉजीसचे तांत्रिक सौजन्य लाभले असून रेडिओ पार्टनर माय एफ एम हे होते.