जळगाव -( जिमाका )- येत्या दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती असुन, हा दिवस जागतिक युवा दिन म्हणुन जगभर साजरा करण्यात येतो.त्या अनुषांगाने दिनांक 12 जानेवारी 2025 पासुन पुढिल आठवडा हा क्रांतिकारी खाज्याजी नाईक शासकिय औ.प्र. संस्था धरणगाव जिल्हा जळगाव येथे जागतिक युवा आठवडा म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक युवा आठवडयात या संस्थेतुन उत्तिर्ण झालेले व यशस्वी उदयोजक म्हणुन नावारूपास आलेल्या विदयार्थ्यांचा गौरव, उदयोजकता विषयावर मान्यवरांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धाचें आयोजन, संस्था परीसर स्वच्छता माहिम, व्यतिमत्व विकास कार्यक्रम, रोजगार मेळावा, प्रमाणपत्र वाटप सारखे उपकम राबविण्यात येणार आहे या कार्यक्रमांचा लाभ परीसरातील युवकांनी घ्यावा असे आवाहान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.