जळगाव – (प्रतिनिधी) – येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या समुदाय विकास विभाग कथा बीएसडब्ल्यू तृतीय वर्षाच्या क्षेत्रकार्य अंतर्गत धानोरा तालुका जिल्हा जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सखुबाई कुंभार उपस्थित होत्या तर त्यांच्या समवेत व्यासपीठावर बचत गटाच्या सीआरपी मालुबाई सोनवणे उपस्थित होत्या. याप्रसंगी पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात कार्यरत असलेल्या महिला व सहायता कक्षाच्या विद्या सोनार आणि भाग्यश्री सोनवणे उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाप्रसंगी समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नितीन बडगुजर आणि प्रा.डॉ. योगेश महाजन यांचे समवेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री राजेंद्र पाटील, सौ जयश्री पाटील, श्री कल्याण पाटील,सौ.सोनल पारधी मॅडम तथा येथील युवा कार्यकर्ते विक्रम अस्वार हे उपस्थित होते.
सदर मेळाव्याप्रसंगी महिला व सहायता कक्षाच्या विद्या सोनार मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित स्पर्श आणि वाईट स्पर्श यावर भाष्य करताना विद्यार्थ्यांना त्याबाबतचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. पोक्सो कायद्याविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराप्रसंगी विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
यानंतर धानोरा येथील बचत गटात कार्यरत असणाऱ्या व गृहिणी असलेल्या एकूण 66 महिलांनी या मेळाव्यात आपला सहभाग नोंदवला. विद्या सोनार मॅडम यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील महिलांचे असलेले जीवन, महिलांचे कुटुंबातील स्थान, महिलांबद्दलची कुटुंबांमध्ये असलेली मानसिकता याबरोबरच सद्यस्थितीतील महिलांबाबत समाजातील बदलता दृष्टिकोन याविषयी मांडणी केली. घरगुती हिंसाचार कायदा 2005 तसेच कामावर होणारा लैंगिक हिंसाचार याविषयी विविध उदाहरणे च्या माध्यमातून अतिशय सखोल अशा स्वरूपाचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपस्थित महिलांमधून काही प्रश्न विचारण्यात आले त्या प्रश्नांचे निरसन देखील विद्या सोनार यांनी केले. याप्रसंगी लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे क्षेत्रकार्य समन्वयक डॉ. नितीन बडगुजर आणि क्षेत्रकार्य पर्यवेक्षक डॉ. योगेश महाजन यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. अश्विनी वारुळे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी झोडगे, किरण चौधरी, करण बागुल,पुष्पराज गावित, अंजली पवार, करुणा सोनवणे तथा धनोरा गावातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.